संध्याकाळी या, आर्यनला हलव्याचे दागिने घालु वगैरे ऐकले आणि वाटलं परत बारसं आहे वाटतं माझं. असा विचार करत असतानाच झोप लागली.
दुसरा दीवस सुरु झाला, घरात गडबड सुरु होतीच, खाद्यपदार्थांचे छान छान वास येत होते. मला आई बाबांनी छान काळा ड्रेस आणला होता, त्याच्यावर आईस क्रीम चे चित्र होते, चांदण्या होत्या. मला आवडला नविन ड्रेस.
मग एकेक जण यायला सुरुवात झाली. काकु, आत्या, ताई बरेच जण आले. मी बघत होतो सगळे जण आईला छोटे छोटे गोल आकाराचे काहीतरी देत होते , आई पण त्यांना देत होती आणि म्हणत होते, "तिळगुळ घ्या, गोड बोला." पण मला नाही दीले कोणी :(
थोड्या वेळाने ही सगळी गँग अचानक माझ्याकडे वळली. एका खोक्यात काहीतरी पांढरे पांढरे दोर्याला बांधलेले होते. ते माझ्या हातांना, पायांना बांधले, गळ्यात पण घातले. आईने तर माझ्या डोक्यावर पण काहीतरी बांधले. आजी म्हणाली,'आर्यन किती छान दीसतोय हलव्याचे दागिने घालुन.' तेव्हा मला कळले हेच ते हलव्याचे दागिने. माझे खुप फोटो काढले सगळ्यांनी.
मग मला आत्याच्या मांडीत बसवुन सगळे जण वाटीतुन चुरमुरे, चॉकलेट्स, बोरे, छोटे छोटे गोल (जे मगाशी सगळे एकमेकांना देत होते ते) माझ्या अंगावर ओतत होते. शेजारची मुलं आणि माझे ताई, दादा पटापट माझ्या अंगावर आजु बाजुला पडलेली चॉकलेट्स, बोरे उचलत होते. मग मी पण पकडत होतो पण माझ्या हातात फक्त चुरमुरेच आले. मला खुप मज्जा आली खाउमध्ये खेळायला. बघा तुम्हीच,
आज मला सगळ्यांनी काय काय आणले होते नविन अंगे, खेळणी, खाउ बरेच प्रकार. सगळ्यांना खाउ खाताना पाहून मला पण भुक लागली. आईला कसे कळले काय माहित ती दुदुची बाटली घेउन आलीच तेव्हढ्यात. मला दुदु पिताना कधि झोप लागली तेच कळले नाही.
फोटो खुपच सूंदर आलाय.. :) आणि पोस्ट पण छान जमलंय.
उत्तर द्याहटवाKhup chan lihile ahes. Photo pan cute alet - Shamumavashi
उत्तर द्याहटवाThanks Mahendrakaka.
उत्तर द्याहटवाShamu mavashi avadale na!
उत्तर द्याहटवावाचून माझ्या भाच्याच्या बोअरनान ची आठवण आली.
उत्तर द्याहटवाअसच झाला होतं. आणि माझ्या दुसर्या भाच्याचे नाव पण आर्यन आहे.
फोटो छान आले आहेत.
to99.wordpress.com
to99,
उत्तर द्याहटवाधन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत!