हे माझे आणखी एक नाव आहे.
"खाबूनंदन" खाण्याची अत्यंत आवड असलेला. मी आजीला, आईला बरेचदा लोकांना सांगताना ऐकले आहे कि मी फारसा रडत नाही.पण मला भुक लागली असेल आणि पटकन 'दुदु', 'पेज', 'भरडी', 'सेरेलॅक', 'नाचणी सत्त्व', 'फळांचे ज्युस' यापैकी काही तरी दिले गेले नाही तर मात्र मी रडुन, आरडा ओरडा करुन घर डोक्यावर घेतो. त्यामुळे माझे 'हे रुप' पाहणार्याला वरचे आजीचे सांगणे खरे वाटत नाही :)
तसाच माझा एक नियम आहे, झोपताना मला तोंडात 'दुदुची बाटली' लागते अशी,
आणि मी झोपलो असलो तरी ती काढायची नाही. आपोआप गळुन पडली की मगच उचलायची. कशी ते पहा,
Ho apala khabunandan nakkich ase mhanat asel - Shamumavashi
उत्तर द्याहटवा