समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

बुधवार, जानेवारी २०, २०१०

कशासाठी पासपोर्टसाठी

आज मला आईने एका नविन स्वच्छ पांढर्‍या दुपट्यावर ठेवले. एका सरळ रेषेत. माझे टोपरे पण काढुन टाकले (बरं वाटलं) आणि फोटो कढायला सुरुवात केली. भरपुर फोटो काढले तीने, वेगवेगळ्या कोनातुन. पोटभर फोटो काढुन परत टोपरे बांधुन मला पाळण्यात ठेवले. संध्याकाळी बाबांनी घरी आल्यावर आईला विचारले, आर्यनचे फोटो काढलेस का?
आईने डिजिकॅम मधले फोटो बाबांना दाखवले. एकेक फोटो पाहून बाबांना हसू आवरेनासे झाले. काही फोटोंना तर बाबांनी काय म्हटले माहित्ये, 'सोमालियातील कुपोषित बालकाचे फोटो'. हे ऐकुन आई मात्र थोडी रागावली. हे बघा ते फोटो,


दुसर्‍या दिवशी पुन्हा माझे टोपरे काढुन फोटोसेशन सुरु झाले. आज मी ठरवले होते की आईला छान पोझेस द्यायच्या, काल बाबा हसले ना माझ्या फोटोंना. अशी मस्त पोझ दिली, तरी काही आईला पसंत पडेना.


कारण बाबांनी आईला सांगितले होते, फोटोत आर्यनचे दोन्ही दोळे उघडे असायला हवेत आणि दोन्ही कान नीट दिसत असले पहीजेत. त्यामुळे दोन तिन दिवस रोज आमचा हा फोटोसेशनचा कार्यक्रम चालला होता आणि एक दिवस आईला हवा तसा फोटो मिळाला. हा बघा तो फोटो,













तशीच मजा बाबांबरोबर झाली. माझ्या डाव्या हाताच्या अंगठ्याला काहीतरी नीळं लावून तो त्या कागदावर ठेवायला जात, पण माझा अंगठा कागदावर नेइपर्यंत माझी मूठ मिटली जायची आणि माझा तळहात, बाबांची बोटं सगळं नीळं नीळं होउन जात असे. शेवटी कसातरी दोघांनी मिळून माझ्या अंगठ्याचा ठसा घेतला. हे सगळं कशासाठी चाललं होतं तर म्हणे माझ्या पासपोर्टसाठी.

मला एक प्रश्न पडलाय, कोण आहे हा पासपोर्ट आणि त्याला माझा फोटो कशाला हवा होता?

१२ टिप्पण्या:

  1. :D
    खरंच लहान मुलांच्या मनात किती प्रश्न येत असतिल नां?? शेवटचा फोटो छान आलाय.. :)

    उत्तर द्याहटवा
  2. खुप प्रश्न पडत असतील, आर्यन अजुन बोलायला लागला नाहीये म्हणून. नंतर पाउस पडेल प्रश्नांचा आमच्यावर. मॅटर्नीटी लीव्ह वर असताना खुप फोटो काढायचे मी आर्यनचे, पण त्यांचा छान उपयोग होतोय आता मला.

    उत्तर द्याहटवा
  3. Waaaaoooh..kiti chaan aahe he smalliechiduniya mala pan ghena tujhya duniyet:-)

    उत्तर द्याहटवा
  4. छान झाला आहे पोस्ट.आर्यनच भावविश्व मस्त सादर करत आहात...शेवटचा फ़ोटो भारी आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. बेलोशाताई,

    तु तर माझ्या दुनियेत आहेसच!

    उत्तर द्याहटवा
  6. दवबिंदु, धन्यवाद!

    मी आर्यनचे खुप फोटो काढले आहेत आहेत. प्रत्येक फोटोशी निगडीत अनेक आठवणी आहेत ज्या काळाच्या ओघात कदाचित विसरायला होतील, म्हणून हा लेखन प्रपंच - सोनाली

    उत्तर द्याहटवा
  7. changala prapanch aaahe...majhyakade aarush che khup photo aahet pan asa kahi kela nahi asa aata watatay...khar Mahendra kakani tevha suchawala hota blog karayala pan rahun gela...aaso...Aryan gondas distoy...

    उत्तर द्याहटवा
  8. मस्तच आलेत की फोटो...आर्यन तुझे फोटो पाहून ना मला गौराताईच्या अश्याच पासपोर्टच्या फोटोंची आठवण आली बघ.....तुला गम्मत माहितीये तिच्या पासपोर्टवर तिच्या बोटाचा ठसा म्हणून मावशीच्याच करंगळीचा ठसा उमटवून आम्ही गंडवलेय सगळ्यांना.....गौराताई आता शाळेत जायला लागलीये, तुला मात्र अजुन घरीच गम्माडी गम्मत करायचीये वर्षभर....

    उत्तर द्याहटवा
  9. आर्यनच्या ब्लॉगवर मनापासुन स्वागत अपर्णा.

    हो मी पण महेन्द्रकाकांकडुनच प्रेरणा घेवुन हा ब्लॉग सुरु केला आहे. तुम्ही अजुनही सुरु करु शकता आरुषचा ब्लॉग. धन्यवाद प्रतिक्रिया दील्याबद्दल.

    उत्तर द्याहटवा
  10. तन्वी,

    सुस्वागतम!
    आर्यन बोलायला लागेपर्यंत मलाच उत्तर द्याव लागेल तुम्हा सगळ्यांना :) अम्हाला सुचलं नाही करंगळीचा ठसा घ्यायला किती सोपे झाले असते.
    सोनाली

    उत्तर द्याहटवा
  11. Faar chaan ahe he... ani wachaniya sudhha :)

    Ata navin post chi waat pahin mi.

    Till then have Fun Aryan... :)

    उत्तर द्याहटवा