कधि नव्हे ते आईने मला सहा वाजता उठवले. मला खुप हाका मारलेल्या आणि उभे केलेले आठवते. नंतर पाहिले तर मी बाथरुममध्ये आंघोळ करत होतो, म्हणजे आई घालत होती.
मला कपडे घालुन बाबांबरोबर खाली पाठवण्यात आले, आईचे अजुन आवरायचे होते. बाबा म्हणाले, आज तुझा पहिला लांबचा प्रवास तोही 'महडच्या गणपतिला'. यावरुन मला एवढ कळलं, आम्ही महडला जात आहोत. जाताना आम्ही राम मारुति रोडवर थांबलो होतो, मामाआजोबा आणि मामीआजीला गाडीत घेण्यासाठी. तेव्हढ्यात धाडकन आवाज झाला आणि आख्खी गाडी हलली.
बाबा एका मिनिटात गाडीच्या बाहेर, मी आणि आई पण आलो बाहेर मग. एका मुलग्याने बाईक आमच्या गाडीवर आपटली. नंबर प्लेटचे दोन तुकडे झाले, बाकी काही नुकसान झाले नाही. दणकट आहे आमची गाडी. त्यादिवशी मी पहील्यांदा बाबांना एव्हढे चिडलेले पाहीले.
अशी आमची प्रवासाला सुरुवात झाली. ठाणे सोडले, पनवेलहुन खोपोलीच्या रस्त्याला लागलो. पळणारी झाडे, रस्ते, माणसे पाहून माझे डोळे दमले आणि थोड्या वेळातच मला झोप लागली. मी उठलो तेव्हा बहुतेक महड आले होते. कारण सगळे बाहेर होते मी एकटाच मगच्या सिटवर होतो. मग मी जागा झाल्याची सगळ्यांना जाणिव करुन दिली.
आज बाबांच्या एका हातात फुलांचा हार, पेढे, नारळ आणि पाण्याच्या बाटल्यांची बॅग, पाठीवर सॅक असे माझ्यासकट सगळे सामान होते. कारण आईने बाबांना सांगितले, साडी नेसल्यामुळे तीला हँडीकॅप झाल्यासारखे झाले आहे.
देवळात गेलो थोडा वेळ रांगेत उभे राहिल्यावर आम्ही गाभार्यात प्रवेश केला. बाबांनी बाप्पाला मोठा हार घातला, आईने नारळ, पेढे ठेवले बाप्पासमोर. तिथे एका ताटलीत केवढा खाउ होता, माझे तिकडेच लक्ष होते. तेव्हढ्यात एका धोतर नेसलेल्या आजोबांनी मला उचलले आणि बाप्पाच्या पायावर माझे डोके टेकवले, माझ्या नाकात दुर्वा गेल्या मला किती शिंका आल्या माहित्ये.
बाहेर आल्यावर मी आईच्या मांडीवर होतो दुदु पित, आई अथर्वशिर्ष म्हणत होती. दुदु पिउन झाल्यावर मस्त रांगत फिरलो मी आजुबाजुला.
दर्शन पटकन झाले त्यामुळे बाबा खुश झाले. मला माहित आहे त्यांना तिथली मिसळ खायची होती म्हणून. सगळ्यांनी भजी, मिसळ, पोहे काय काय हादडले. मग गाडीपर्यंत आलो तर सगळ्यांना कोकम सरबत प्यायची लहर आली. मला आणि आईला गाडीजवळ सोडुन सगळे गेले सरबत प्यायला. आई हँडीकॅप झालेली असल्यामुळे तिने मला बाबांच्या सीटवर बसवले खेळायला. मी पण म्हटलं चला बाबा येइपर्यंत गाडी वळवुन ठेवुया तर समोर एक मोठा 'भु भु' बसलेला. किती हॉर्न वाजवला तरी काही उठला नाही, शेवटी मी स्वतः उभा राहुन त्याला अअॅSSSSSSS केले तरी पण हलला नाही. माझा जोश पाहुन आईने एक फोटो पण काढला माझा, हा बघा
तेव्हढ्यात बाबा आले आणि माझी रवानगी मागच्या सिटवर झाली आईजवळ. येताना पण खुप गमति बघितल्या रस्त्यात. मस्त झाला माझा पहिला लांबचा प्रवास.
माझ्या विश्वात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत! स्वागत! स्वागत! तुम्हाला मी माझ्या जगात घेउन जाणार आहे, चला तर मग या आगळ्या वेगळ्या दुनियेच्या सफरीला.
समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥
गुरुवार, फेब्रुवारी २५, २०१०
शुक्रवार, फेब्रुवारी १९, २०१०
शितळ शिमगा (रंगपंचमी)
काल मी बाबांच्या आत्याकडे गेलो होतो म्हणजे माझी आत्याआजी. जाताना तिने मला १००रु. दीले आणि म्हणाली, शितळ शिमगा आहे ना, पांढरा कपडा घे हो त्याला. माझं काय बाजारात जाण होत नाही. आई आजीला हो म्हणाली. १५ तारखेला आर्यनचा शितळ शिमगा करायचा ठरवलं आहे. नक्की या तेव्हा. असे आमंत्रण पण दीले आईने तिला. तेवढे मी बरोबर ऐकले.
तिथुन आम्ही बाहेर पडलो शॉपिंगला. मला दोन सुती अंगे घेतले, मग खुप सार्या छोट्या छोट्या खायच्या रंगाच्या दब्या घेतल्या आईने. गुलाबी, हिरवा, पिवळा, केशरी. येताना कानेटकरांकडे पुरणपोळीची ऑर्डर पण दिली.
पण मला काही केल्या कळतं नव्हत शितळ शिमगा हे काय आहे. रात्री आई मला सांगत होती, शनु, हा तुझा पहीला उन्हाळा मग तुला त्याची ओळख करुन द्यायला आपण परवा शितळ शिमगा करायचा आहे. एवढेच सांगितले, म्हणजे काय करायचे आहे ते काही बोलली नाही.
आज १५ मार्च २००९. मला खुप उत्सुकता आहे शितळ शिमगा बघायची.
आइने चार बाउल घेतले त्यात त्या परवा घेतलेल्या रंगाच्या डब्यांमधले खाऊचे रंग टाकले आणि पाणी घालुन मस्त केशरी, हिरवे, गुलाबी, पिवळे पाणी तयार केले. मधे शेवंती, मधुमालतीची फुलं ठेवली. आत्याने गंमत आणली होती बत्ताशांचा हार आणि द्राक्षांची माळ.
मला आत्तुच्या मांडीत बसवले आणि गळ्यात द्राक्षांची आणि बत्ताशांची माळ घातली. आजीने ओवाळले आणि मग एकेकांनी फुलांनी माझ्यावर ते मगाचचे रंगच उडवायला सुरुवात केली. कोणी अंग्याला रंग लावला, कोणी गालाला, तर कोणी हाताला. मज्जा येत होती, गार गार वाटत होतं मला.
मी तर हळुच माळेतलं एक द्राक्ष पण खाल्लं होतं मग आईने तोंडात बोट घालुन काढलं आणि छोटे छोटे कण करुन भरवलं :)
तर असा होता माझा शितळ शिमगा म्हणजेच रंगपंचमी. आई पण ना! सोप्पी गोष्ट कठीण करुन सांगते. आधीच सांगायचं ना रंगपंचमी करायच्ये म्हणुन. शितळ शिमगा काय प्रकार आहे याचा विचार करण्यात किती वेळ गेला माझा दोन दीवस!

शुक्रवार, फेब्रुवारी ०५, २०१०
फोटो फोटो आणि फोटो
Too young for modelling
This is my style
Dad & I, friends forever...........
Mom's mirror image...Aaryan
गुरुवार, फेब्रुवारी ०४, २०१०
"Pink is not my colour"
गुलाबी रंग हा मुलिंचा रंग म्हणून ओळखला जातो आणि मुलांच्या वापरात नेहेमी नीळा रंग असतो. सगळ्या जगाला ही गोष्ट माहिती आहे बहुतेक माझ्या आईला सोडून.
का? या ब्लॉगमधले माझे फोटो पाहिलेत? तुमच्या लक्षात येइल, कसे माझे maximum फोटो गुलाबी अंगा घातलेले आहेत.
आता हे रंगांबद्दल मला कसे कळले?
परवा अमेरीकेत रहाणारी माझी मावशी आली होती. ती आईला म्हणाली, तिथल्या Hospital मध्ये मुलगा बाळाला निळ्या रंगाच्या दुपट्यात गुंडाळुन ठेवतात. आणि मुलगी बाळाला गुलाबी रंगाच्या दुपट्यात ठेवतात.
हे मला कळल्यापासुन त्या सगळ्या गुलाबी अंग्यांचा मला एवढा राग येतो ना!
तरी परत मी पालथा पडायला लागलो तेव्हाचा माझा फोटो गुलाबी कपड्यातच :( हा पहा,
आता मी वाट बघतोय कधि एकदा मला बोलायला यायला लागेल. मग मी ओरडुन ओरडुन सांगेन आईला, "Pink is not my colour"

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)