समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

गुरुवार, फेब्रुवारी ०४, २०१०

"Pink is not my colour"

गुलाबी रंग हा मुलिंचा रंग म्हणून ओळखला जातो आणि मुलांच्या वापरात नेहेमी नीळा रंग असतो. सगळ्या जगाला ही गोष्ट माहिती आहे बहुतेक माझ्या आईला सोडून.

का? या ब्लॉगमधले माझे फोटो पाहिलेत? तुमच्या लक्षात येइल, कसे माझे maximum फोटो गुलाबी अंगा घातलेले आहेत.
आता हे रंगांबद्दल मला कसे कळले?
परवा अमेरीकेत रहाणारी माझी मावशी आली होती. ती आईला म्हणाली, तिथल्या Hospital मध्ये मुलगा बाळाला निळ्या रंगाच्या दुपट्यात गुंडाळुन ठेवतात. आणि मुलगी बाळाला गुलाबी रंगाच्या दुपट्यात ठेवतात.
हे मला कळल्यापासुन त्या सगळ्या गुलाबी अंग्यांचा मला एवढा राग येतो ना!
तरी परत मी पालथा पडायला लागलो तेव्हाचा माझा फोटो गुलाबी कपड्यातच :( हा पहा,


आता मी वाट बघतोय कधि एकदा मला बोलायला यायला लागेल. मग मी ओरडुन ओरडुन सांगेन आईला, "Pink is not my colour"

४ टिप्पण्या:

  1. गुलाबी रंग पण चालेल अजुन काही वर्षं .. छान दिसतो.. जो पर्यंत बोलता येत नाही, तो पर्यंत तुला आवडेल ते घालुस शकतेस. आमच्या दोन्ही मुलींचे फ्रॉक्स सेम असायचे अगदी चांगल्या मोठ्या होई पर्यंत. नंतर जेंव्हा त्यांना निट समजायला लागलं, सातवी- आठवित गेल्यावर.. मग बंद केलं. जुने फोटो आहेत बरेच. बघायला मस्त वाटतात..

    उत्तर द्याहटवा
  2. :)

    अजुन काही वर्ष तरी मी घालेन ते कपडे घालेल, मग त्याचे नखरे सुरु होतील. लहानपणी आमचे पण एकाच कापडाचे फ्रॉक असायचे, मजा येते ते फोटो पहाताना.

    उत्तर द्याहटवा
  3. शमु,
    :) तसा तो आपल्याला नंगु पण छानच दिसतो, नाही का?

    उत्तर द्याहटवा