समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

गुरुवार, फेब्रुवारी २५, २०१०

Loooooooooooong Drive......

कधि नव्हे ते आईने मला सहा वाजता उठवले. मला खुप हाका मारलेल्या आणि उभे केलेले आठवते. नंतर पाहिले तर मी बाथरुममध्ये आंघोळ करत होतो, म्हणजे आई घालत होती.
मला कपडे घालुन बाबांबरोबर खाली पाठवण्यात आले, आईचे अजुन आवरायचे होते. बाबा म्हणाले, आज तुझा पहिला लांबचा प्रवास तोही 'महडच्या गणपतिला'. यावरुन मला एवढ कळलं, आम्ही महडला जात आहोत. जाताना आम्ही राम मारुति रोडवर थांबलो होतो, मामाआजोबा आणि मामीआजीला गाडीत घेण्यासाठी. तेव्हढ्यात धाडकन आवाज झाला आणि आख्खी गाडी हलली.
बाबा एका मिनिटात गाडीच्या बाहेर, मी आणि आई पण आलो बाहेर मग. एका मुलग्याने बाईक आमच्या गाडीवर आपटली. नंबर प्लेटचे दोन तुकडे झाले, बाकी काही नुकसान झाले नाही. दणकट आहे आमची गाडी. त्यादिवशी मी पहील्यांदा बाबांना एव्हढे चिडलेले पाहीले.
अशी आमची प्रवासाला सुरुवात झाली. ठाणे सोडले, पनवेलहुन खोपोलीच्या रस्त्याला लागलो. पळणारी झाडे, रस्ते, माणसे पाहून माझे डोळे दमले आणि थोड्या वेळातच मला झोप लागली. मी उठलो तेव्हा बहुतेक महड आले होते. कारण सगळे बाहेर होते मी एकटाच मगच्या सिटवर होतो. मग मी जागा झाल्याची सगळ्यांना जाणिव करुन दिली.
आज बाबांच्या एका हातात फुलांचा हार, पेढे, नारळ आणि पाण्याच्या बाटल्यांची बॅग, पाठीवर सॅक असे माझ्यासकट सगळे सामान होते. कारण आईने बाबांना सांगितले, साडी नेसल्यामुळे तीला हँडीकॅप झाल्यासारखे झाले आहे.
देवळात गेलो थोडा वेळ रांगेत उभे राहिल्यावर आम्ही गाभार्‍यात प्रवेश केला. बाबांनी बाप्पाला मोठा हार घातला, आईने नारळ, पेढे ठेवले बाप्पासमोर. तिथे एका ताटलीत केवढा खाउ होता, माझे तिकडेच लक्ष होते. तेव्हढ्यात एका धोतर नेसलेल्या आजोबांनी मला उचलले आणि बाप्पाच्या पायावर माझे डोके टेकवले, माझ्या नाकात दुर्वा गेल्या मला किती शिंका आल्या माहित्ये.
बाहेर आल्यावर मी आईच्या मांडीवर होतो दुदु पित, आई अथर्वशिर्ष म्हणत होती. दुदु पिउन झाल्यावर मस्त रांगत फिरलो मी आजुबाजुला.
दर्शन पटकन झाले त्यामुळे बाबा खुश झाले. मला माहित आहे त्यांना तिथली मिसळ खायची होती म्हणून. सगळ्यांनी भजी, मिसळ, पोहे काय काय हादडले. मग गाडीपर्यंत आलो तर सगळ्यांना कोकम सरबत प्यायची लहर आली. मला आणि आईला गाडीजवळ सोडुन सगळे गेले सरबत प्यायला. आई हँडीकॅप झालेली असल्यामुळे तिने मला बाबांच्या सीटवर बसवले खेळायला. मी पण म्हटलं चला बाबा येइपर्यंत गाडी वळवुन ठेवुया तर समोर एक मोठा 'भु भु' बसलेला. किती हॉर्न वाजवला तरी काही उठला नाही, शेवटी मी स्वतः उभा राहुन त्याला अअ‍ॅSSSSSSS केले तरी पण हलला नाही. माझा जोश पाहुन आईने एक फोटो पण काढला माझा, हा बघा


तेव्हढ्यात बाबा आले आणि माझी रवानगी मागच्या सिटवर झाली आईजवळ. येताना पण खुप गमति बघितल्या रस्त्यात. मस्त झाला माझा पहिला लांबचा प्रवास.

१६ टिप्पण्या:

  1. फोटो एकदम मस्त आहे अणि आर्यन बाळाचे प्रवास वर्णन पण.
    खुप मजा वाटली वाचुन पुढची सगळी प्रवास वर्णन पण ऐकायला आवडतील अम्हाला.

    उत्तर द्याहटवा
  2. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. इतका छान छान लिहायला सुचत कस तुला? मोठा होउन अर्यन जेव्हा वाचेल तेव्हा त्याला खूप गम्मत वाटेल.
    आणि लीहीण्या मागची मेहनत पण कळेल.तो पर्यंत अम्ही मात्र मस्त enjoy करतो आहे हे वाचून.

    उत्तर द्याहटवा
  4. शमु,
    फोटो पहाताना आठवते त्या फोटो मागची गंमत. मग काय लिहुन काढते.

    उत्तर द्याहटवा
  5. खुपच सुंदर आलाय फोटो.. पण हे काय? बाहेर जातांना नविन कपडे नाही घातलेस?? मोठा झाला की रागावेल तो बघ तुला, मला असंच फिरायला नेलं म्हणुन.

    उत्तर द्याहटवा
  6. रागवु दे :)
    मला जाम आवडायचा हा dress त्याचा. Cute दिसतो.

    उत्तर द्याहटवा
  7. Lucky dude you got a nice big car.
    I am sure you will enjoy many such long rides with your dad & mom in future.
    Aarayancha Baba

    उत्तर द्याहटवा
  8. मला वाटलंच होतं कि कारचच कौतुक होणार, आई एवढं लिहीत्ये त्याचे काही नाही :)
    आर्यनची आई

    उत्तर द्याहटवा
  9. अरे व्वा..मजा आहे आर्यनची फ़्रन्ट सीटला बसायला मिळतंय...इथे तर आरुषला कारसीटशिवाय गाडी दर्शन नाही...

    उत्तर द्याहटवा
  10. नेहेमी नाही मिळत. बंद गाडीत थोडावेळ तेसुद्धा बाबा नसताना, नाहीतर आहे कायम मागची सिट

    उत्तर द्याहटवा
  11. वाह पहिल्यांदाच ब्लॉगला भेट देतोय..आवडला. मस्त. खूप क्यूट आहे आर्यन आणि आर्यनचे विश्व.
    God Bless you

    उत्तर द्याहटवा
  12. धन्यवाद सुहास!
    काहीतरी लिहावे असे सारखे वाटत होते आणि आर्यनचे खुप फोटो आहेत जे पहाताना जाणवले, याचाच एक ब्लॊग करुया, आर्यन मोठा झाल्यावर त्याला मज्जा वाटेल वाचायला.
    आर्यनच्या विश्वाला अशिच भेट देत रहा.

    उत्तर द्याहटवा
  13. सोनाली, आर्यन किती गोड दिसतोय. आणि अगदी खूश होती की स्वारी व्हील हातात मिळाल्यावर. मस्तच लिहिलेस.

    उत्तर द्याहटवा
  14. श्रीताई,
    आर्यनला खुप मज्जा वाटते ड्रायव्हर सिटवर, उठायला तयार नसतो. बाळाच्या भूमिकेतुन लिहायला मजा येत्ये मला.

    उत्तर द्याहटवा
  15. आत्ता महेंद्र काकांच्या ब्लोग वर असताना तिथून तुमच्या ब्लोग वर उडी मारली..खरच खूप सुंदर आहे ब्लोग...मला आवडला...आर्यन ची मज्जा आहे....लिखाण छान अन ओघवत आहे...

    उत्तर द्याहटवा
  16. सागर,
    धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत!
    महेन्द्रकाकांकडुनच स्फुर्ति घेवुन ब्लॉग तयार केला आहे.

    उत्तर द्याहटवा