काल मी बाबांच्या आत्याकडे गेलो होतो म्हणजे माझी आत्याआजी. जाताना तिने मला १००रु. दीले आणि म्हणाली, शितळ शिमगा आहे ना, पांढरा कपडा घे हो त्याला. माझं काय बाजारात जाण होत नाही. आई आजीला हो म्हणाली. १५ तारखेला आर्यनचा शितळ शिमगा करायचा ठरवलं आहे. नक्की या तेव्हा. असे आमंत्रण पण दीले आईने तिला. तेवढे मी बरोबर ऐकले.
तिथुन आम्ही बाहेर पडलो शॉपिंगला. मला दोन सुती अंगे घेतले, मग खुप सार्या छोट्या छोट्या खायच्या रंगाच्या दब्या घेतल्या आईने. गुलाबी, हिरवा, पिवळा, केशरी. येताना कानेटकरांकडे पुरणपोळीची ऑर्डर पण दिली.
पण मला काही केल्या कळतं नव्हत शितळ शिमगा हे काय आहे. रात्री आई मला सांगत होती, शनु, हा तुझा पहीला उन्हाळा मग तुला त्याची ओळख करुन द्यायला आपण परवा शितळ शिमगा करायचा आहे. एवढेच सांगितले, म्हणजे काय करायचे आहे ते काही बोलली नाही.
आज १५ मार्च २००९. मला खुप उत्सुकता आहे शितळ शिमगा बघायची.
आइने चार बाउल घेतले त्यात त्या परवा घेतलेल्या रंगाच्या डब्यांमधले खाऊचे रंग टाकले आणि पाणी घालुन मस्त केशरी, हिरवे, गुलाबी, पिवळे पाणी तयार केले. मधे शेवंती, मधुमालतीची फुलं ठेवली. आत्याने गंमत आणली होती बत्ताशांचा हार आणि द्राक्षांची माळ.
मला आत्तुच्या मांडीत बसवले आणि गळ्यात द्राक्षांची आणि बत्ताशांची माळ घातली. आजीने ओवाळले आणि मग एकेकांनी फुलांनी माझ्यावर ते मगाचचे रंगच उडवायला सुरुवात केली. कोणी अंग्याला रंग लावला, कोणी गालाला, तर कोणी हाताला. मज्जा येत होती, गार गार वाटत होतं मला.
मी तर हळुच माळेतलं एक द्राक्ष पण खाल्लं होतं मग आईने तोंडात बोट घालुन काढलं आणि छोटे छोटे कण करुन भरवलं :)
तर असा होता माझा शितळ शिमगा म्हणजेच रंगपंचमी. आई पण ना! सोप्पी गोष्ट कठीण करुन सांगते. आधीच सांगायचं ना रंगपंचमी करायच्ये म्हणुन. शितळ शिमगा काय प्रकार आहे याचा विचार करण्यात किती वेळ गेला माझा दोन दीवस!
मी miss केला बाळाचा शितळ शिमगा.पण फोटो बघुन खुप छान वाटतय.खूप गोड गोड दिसतोय रंगामध्ये.आता येते आहे की दुसरी होळी आर्यनला रंग खेळायला.तेव्हा खेळू.
उत्तर द्याहटवाशमु,
उत्तर द्याहटवाआर्यनला तुमच्याच ताब्यात देणार आहे, रंगवा किती रंगवायचे तेव्हढे. पण आंघोळ घालुन स्वच्छ पण तुम्हालाच करायला बसवेन :)
सहीच.सोनाली, शोमूच्या पहिल्या रंगपंचमीची खूप आठवण आली गं. डोळे भरून आले बघ. पोरं किती पटकन मोठे होतात. काय गं उगाच आर्यनच्या उल्लूश्या डोक्याला त्रास दिलास, बिचारा. हो ना आर्यन..... नॉट फेअर...हेहे.....
उत्तर द्याहटवाभाग्यश्रीताई,
उत्तर द्याहटवामला पण जाणवते आहे, आत्ता आत्ता रांगणारा आर्यन चालायला लागलाय आणि धावण्याचा प्रयत्न करतोय, किती पटकन झालं सगळ असे वाटते.
लहान बाळं पण काहिना काहि विचार नक्किच करत असतिल.