गुलाबी रंग हा मुलिंचा रंग म्हणून ओळखला जातो आणि मुलांच्या वापरात नेहेमी नीळा रंग असतो. सगळ्या जगाला ही गोष्ट माहिती आहे बहुतेक माझ्या आईला सोडून.
का? या ब्लॉगमधले माझे फोटो पाहिलेत? तुमच्या लक्षात येइल, कसे माझे maximum फोटो गुलाबी अंगा घातलेले आहेत.
आता हे रंगांबद्दल मला कसे कळले?
परवा अमेरीकेत रहाणारी माझी मावशी आली होती. ती आईला म्हणाली, तिथल्या Hospital मध्ये मुलगा बाळाला निळ्या रंगाच्या दुपट्यात गुंडाळुन ठेवतात. आणि मुलगी बाळाला गुलाबी रंगाच्या दुपट्यात ठेवतात.
हे मला कळल्यापासुन त्या सगळ्या गुलाबी अंग्यांचा मला एवढा राग येतो ना!
तरी परत मी पालथा पडायला लागलो तेव्हाचा माझा फोटो गुलाबी कपड्यातच :( हा पहा,
आता मी वाट बघतोय कधि एकदा मला बोलायला यायला लागेल. मग मी ओरडुन ओरडुन सांगेन आईला, "Pink is not my colour"