समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

सोमवार, जानेवारी १८, २०१०

बारसं , २० सप्टेंबर २००८

आज सकाळपासुन घरात काहितरी गडबड सुरु आहे. कळत नाहीये काय ते, पण आजी म्हणत होती 'बारसं' आहे आज. तेव्हढ्यात मला झोप लागली त्यामुळे पुढचे काही कळले नाही. जाग आली तेव्हा रोजच्यापेक्षा घरात जास्त माणसं जमा झाली आहेत असे वाटले.

आई मला नविन अंगा घालत होती आणि म्हणाली, 'शनु आज तुझं बारसं आहे, तुला नविन नाव मिळणार'. अरेच्च्या! म्हणजे माझेच कहितरी आहे आज. तरीच मला नटवत आहेत. पण मला काय करायचेय नविन नाव, आईचा 'शनु', बाबांचा 'ढबुल्या', आजीचा,'राणाप्रताप' आणि आईच्या मैत्रीणींचा, 'Smallie' एव्हढी नावं असताना.

आजुबाजुला रंगीत फुगे,फुलं होती मी छान खेळत होतो पाळण्यात. मग मला आजी आणि दुसरी आजी यांनी 'गोविंद घ्या कोणि गोपाळ घ्या' म्हणत पाळण्याच्या वर खाली फिरवीले, मज्जा आली. मग आईने हळूच माझ्या कानात सांगीतले, "आर्यन"

मी मावशीच्या मांडीवर पडुन होतो, आई शेजारी बसली होती आणि बाबा फोटो काढत होते. मग एक एक काकु, मामी , सगळ्या जमलेल्यांनी मला काय काय द्यायला सुरुवात केली. प्रत्येक जण एकेक कपडा घेउन माझ्या अंगावर ठेवी, दुपटे पांघरुन दाखवी, टोपरे पण डोक्याला लावत. कंटाळा आला मला, मी आधी रडून दाखवले, शु शु पण केली नविन कपड्यांवर तरी काही नाही, थोड्या वेळ थांबत की पुन्हा आपले सुरु. शेवटी मीच झोपुन गेलो,


जाग आली तेव्हा आईच्या कुशीत होतो. घरी पण रोजचीच सगळी माणसं दिसत होती.

संपलं वाटत 'बारसं'

४ टिप्पण्या:

 1. अरे वा.. बाळाचे पाय पाळण्यातच दिसताहेत. आत्तापासुनच ब्लॉगिंग?? छान झालंय पोस्ट.. अन फोटो ग्राफ्स पण सुंदर आले आहेत..

  उत्तर द्याहटवा
 2. खुप खुप धन्यवाद महेन्द्रकाका! आर्यनच्या ब्लॉगला पहिली comment तुमची, वाह क्या बात है! आता त्याचा ब्लॉग नक्कीच दुडुदुडु धावणार - सोनाली

  माझ्या आई/बाबांमुळे पोटात असल्यापासुनच संगणक वापरायला शिकलोय त्याचाच परीणाम असेल हा ब्लॉग :) - आर्यन

  उत्तर द्याहटवा
 3. अरे वा ...ज्युनियर ब्लॉगरबुवा मस्तच झाले की तुमचे बारसे....पण मावशीला न बोलावताच केलेत ना...ठीके राजा, बारसे तर केलेस असेच पण मुंज आणि लग्नाला बोलावले नाहिस तर मावशी कट्टी करेल हं!!!!

  उत्तर द्याहटवा
 4. अगं तन्वीमावशी, तेव्हा आईला तुझा पत्ता माहिती नव्हता म्हणून बोलावु शकलो नाही, शॉरी. मुंजीला आणि पुढच्या सगळ्या कार्यक्रमांना तुला नक्की आमंत्रण बघं!
  आर्यन

  उत्तर द्याहटवा