माझी ही पोस्ट आहे बिनाफोटोची. का? अहो फोटोग्राफर आणि फोटोविषय दोघही ढसाढसा रडत होते मग फोटो कोण काढणार?
थांबा थांबा असं मधुनच नको विस्ताराने सांगतो.
घरातली स्वयंपाकघर ही माझी सगळ्यात आवडती खोली आहे. आई जर काही बनवत असली तर मी जातीनं तिथे हजर असतो.
त्यादिवशी मी मस्त गिरकीचा खेळ खेळत होतो एका स्टिलच्या ५ किलोच्या डब्याशी. डब्याला एका बाजुला हाताने गोल फिरवायचं की तो मस्त गोल फिरतो. छान रमलो होतो मी. आई कढईत काहितरी ढवळत होती. बाबा खाली पार्किंगमध्ये गाडी पुसत होते. माझा खेळ चांगलाच रंगात आला होता, मी एक मस्त मोठी गिरकी दिली डब्याला आणि ’ढाम्म्म्म्म्म’ झालं. एक सेकंद मला कळलच नाही. माझा उजव्या पायाचा अंगठा. पाच किलोचा मोठा स्टिलचा डबा माझ्या उजव्या पायाच्या बोटाच्या अंगठ्यावर. आई जोरात ओरडली आणि मी जोरात भोकाड पसरले.
माज्या अंगठ्याच्या नखामागची स्किन थोडीशी निघाली आणि रक्त येत होते. मला खूप दुखत पण होते आणि आपल्याला काहितरी झाले याची मला भिती पण वाटत होती. हे काय झालं माझ्या पायाला? मी ओक्साबोक्शी रडत होतो. आई मला उचलुन हॉलमध्ये घेवुन गेली. आता मी आईच्या मांडीत झोपुन रडत होतो. आई माझ्या पायाला काहितरी लावण्याचा प्रयत्न करीत होती. मला सांगत होती ’शनु, रडु नको, मी औषध लावते’ पण मी तिला माझ्या पायाला हातही लावुन देत नव्हतो. अजुन जोरात रडणे सुरु केले ते पाहुन मग आईला पण रडु यायला लागले.
तेव्हढ्यात बाबा दार उघडून आत आले, स्वयंपाकघरातुन धुर येत होता, आई आणि मी रडत होतो हे सगळं पाहुन त्यांना समजेना नक्की काय झालयं. जिथुन धुर येत होता तिकडे म्हणजे किचनमध्ये जावुन त्यांनी गॅस बंद केला. मग आमच्याकडे वळुन म्हणाले , काय झालं? तुम्ही दोघं का रडताय?
आई म्हणाली, स्टिलचा डबा आर्यनच्या पायावर पडला. बाबांनी विचारले, मग तु का रडत्येस?
कारण त्याच्या पायाला लागलयं, रक्त येतयं म्हणून. मी त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं होतं नीट.
छे! ही तर सुरुवात आहे, मोठा झाल्यावर बघ किती धडपडेल तो! हे तर काहीच नाही. सोफ्रामायसिन लाव आणि दुदु पण दे त्याला प्यायला. बाबांनी मला उचलुन घेतले आणि आईने दुदु आणुन दिले प्यायला. हळुच औषध पण लावले.
दुदु संपल्यावर मी भोकाड पसरणार तेव्हढ्यात बाबा म्हणाले, चला बाईकवरुन कोण भुर्र येतय फिरायला. माझी लगेच होकारार्थी मान हलायला लागली मग माझे रडणे आपोआप कमी झाले.
जाताना बाबा आईला म्हणाले आता काळ्याकुट्ट रव्याचा उपमा तर बनु शकत नाही तेव्हा मस्त गजाननचा वडापाव आणतो आपल्याला, आईल पण हसायला आले. मी आणि बाबा मस्त बाईकवरुन फिरुन आलो. मला लागलय हे मी विसरुन पण गेलो.
खाताना बाबा म्हणत होते मगाशी तुमचा दोघांचा फोटो काढायला हवा होता एकत्र रडताना आणि दोघही खूप हसले. नंतर कित्येक दिवस मी बू कुठे झाला म्हटलं की उजव्या पायाच्या अंगठ्याकडे बोट दाखवत असे.
आता कळलं, माझी ही पोस्ट बिनाफोटोची आहे कारण, मला "बू झाला"
आता "बू" बला झालायं नं....आई आणि आर्यन कसे रडताहेत ते पाहायला मज्जा आली असती...पण म्हणून पुन्हा धडपडू नकोस रे.गजाननचा वडापाव.... वा!सहीच आहे... बू आर्यनला झाला पण आईबाबांची चंगळ झाली की.:)
उत्तर द्याहटवाअले ’बु’ झालं?? अले अले...शनु तुला माहितेय आरुषला पहिलं बु झालं तेव्हापण त्याची आईच ललु ललु कलत होती..शेम पिंच...:)
उत्तर द्याहटवातुझ्या मित्राला पण सारखा सारखा बु होत असतो. पण ५ किलोचा डबा.. बाप रे. सांभाळून रे राजा. आणि आईला सांग रडू नको. बाबा म्हणतायत ते बरोबर आहे. ही तर सुरुवात आहे :-)
उत्तर द्याहटवाअसे कारभार कशाला करतोस ? असं म्हणणार होतो.. पण नाही म्हणत..पुढल्या वेळेस आईला, एक रिकामा डबा दे म्हणावं खेळायला म्हणजे काही बू होणार नाही तुला..
उत्तर द्याहटवाबरं... झालं कां बरा बू तुझा? की अजून त्रास होतोय?
Kittiii sahiii aahe tuza blog.....!!! javal javal saglya posts wachun kadhalya mi...
उत्तर द्याहटवाPahilyandach aale mi ithe...
Mastach..... Kitti godd aahes re tu...Shoo shweet...!!!
Aani Pillu tuza boo kasay atta...???
Kalaji ghe barr kaa.... aani japun khel...!!!
अरेरेरे...आता कसा आहेस आता बेटा? खूप दुखत नाही ना?..
उत्तर द्याहटवाआईला सांग रडू नकोस, फक्त खेळताना काळजी घे रे सोन्या...
श्रीताई,
उत्तर द्याहटवाबू कधिच बरा झाला. बरं झाल फोटो नाही काढला ते. नाहितर बाबा नेहेमी चेष्टा करत राहिले असते आमची. मी पण खल्ला त्यांच्यातला वडा पाव थोडासा :)
अपर्णाताई,
उत्तर द्याहटवाशेम पिंच...:)
हेरंबदादा,
उत्तर द्याहटवाआता सगळे डबे माझ्या आवाक्याबाहेर गेले आहेत.
म्हणजे माझा मित्र पण माझ्यासारखाच आहे धडपड्या.
महेंद्रकाका,
उत्तर द्याहटवाकारभार मी नाही करणार तर कोण करणार?
आता मला डबा नाही मिळत खेळायला. कढई, पातेली, डावा पळ्या चमचे ही नविन खेळणी मिळतात. जी मला सहज उचलुन कुठेही नेवुन ठेवता येतात :)
बू अत्ता नाही झाला काही, खुप महिन्यांपुर्वी झाला होता. बहुतेक जानेवारी महिन्यात.
मैथिलीताई,
उत्तर द्याहटवातुझे खुप खुप स्वागत आर्यनच्या विश्वात. अशीच नेहेमी येत जा.
बू केव्हाच बरा झाला.
सुहासदादा,
उत्तर द्याहटवामी मजेत आहे. आंबे खातोय मस्तपैकी.
मला बू झाला होता हे मी विसरुन पण गेलो.
बू झाला होता? आता बरा झाला ना! पण बाबांना फोटो घ्यायला सांगायला हवं होतं कुणीतरी म्हणजे आई नि आर्यन कसे ललत होते, ते आम्ही पाहिलं असतं. राजा, आई किचनमधे काही करत असते ना, तेव्हा तिच्यामागे आपण नाही खेळू... जरा लांब राहून खेळत जा हं.
उत्तर द्याहटवाकांचनताई,
उत्तर द्याहटवाब्लॉगवर स्वागत.
बाबांनी कायम चेष्टा केली असती आईची त्या फोटोवरुन, पण खरच काढायला हवा होता :)
किचनपासुन लांब.......अग मला किचनशिवाय कुठली खोली आवडतच नाही :))))))))
बू बरा झाला ना? मग आता परत धिंगाना सुरु. हो, पण जपुन.... आईला रडवू नकोस... "सोफ्रामायसिन" हे नाव तूला बरंच लक्षात राहीलं रे... हुश्शार आर्यन... गुड वेरी गुड
उत्तर द्याहटवाआनंददादा,
उत्तर द्याहटवाबू बरा झाला. आता नविन मस्ती सुरु.
अरे आई बरी मला विसरुन देइल नाव.
आर्यन अरे कर रे धमाल मस्ती (जरा जपून तरी कसे सांगू कारण काय जपायचे ते तुला कसे समजणार तेव्हा तो सल्ला आईसाठी :) )...
उत्तर द्याहटवाआपण आपले उद्योग सुरूच ठेवायचे... धडपडायचे-उठायचे आणि खेळायचे.... :)
आईला म्हणावं सुरूवात आहे ना म्हणून रडलीस मावशी पण रडायची ईशानदादाच्या वेळेस पण गौरीताईचे रेकॉर्ड आहे ..ती दिवसाला २/३ धडका मारते मग तिच्याकडे कोणी लक्षही देत नाही :)
तन्वीमावशी,
उत्तर द्याहटवाअगं हो गं, माझं दिवसातुन एकदा तरी डोक आपटतच कुठेतरी.
मी चालायला लागल्यावर एकदा बाबा मला बाथरुममधे एकटे सोडुन टॉवेल आणायला गेले आणि मी धाडकन बाथरुममधे पडलो तेव्हा पण आई खुप रडलेली.
गौराताई एकदम सॉलिड आहे, दिवसाला २/३ धडका देते :)