समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

सोमवार, एप्रिल १९, २०१०

मी पाहिलेले कोकण - २

मागच्या वेळी कोकणरेल्वेचे नुसते रूळ पाहिले तर यावेळी अख्खी कोरे पाहिली. प्रवास करून पाहिली.
आमचा खाबु ग्रुप चालला होता चिपळूणला मावशीच्या ’केळवणासाठी’. बाबा आमच्या ग्रुपमधुन कटाप झाले होते स्वत:हुन.
विंडो सिट असल्यामुळे बाहेर बघायला पण खुप मज्जा येत होती. पनवेल यायच्या आधिच आजीने आणलेली साबुदाण्याची खिचडी आणि थंडगार कोकम सरबत फस्त करुन झाले आमचे. नंतर थोड्या वेळाने बघतो तर काय, एकसे एक छान छान पदार्थ विकायला यायला लागले रेल्वे पॅंट्रीमधुन. आम्हाला तिघांनाही (आई, मावशी आणि मी पण) खुप वाईट वाटले, उगाच पोटभर खिचडी खाऊन घेतली. सामोसा, वडापाव, कांदाभजी, कटलेट, मेदुवडा, असे बरेच खाऊ आम्ही मिस केले. आत्ता नौच वाजलेत अकरा वाजता आपल्याला भुक लागेल मग आपण या पदार्थांकडे पाहुन घेवू असे दोघींनी ठरवले.
थोड्या वेळाने मी झोपुन गेलो कारण पोटात मस्त खिचडी आणि गरम गरम दु दु गेलेले होते, वर खिडकीतुन छान वारा पण लागत होता. जाग आली तेव्हा ट्रेन थांबली होती आणि गडबड गडबड ऐकु येत होती. मावशीचा मेदुवडा खाउन झाला होता आणि आई टोमॅटो सुप पित होती. असे काय काय खाता पिता एकदाचे चिपळूण आले.
घरी पोचतो तर काय पन्ह तयारच होतं. जेवताना पण आंब्याची डाळं, वगैरे मस्त चंगळ होती. आदल्या दिवशीच चैत्रगौरीचे हळदी कुंकु झाले होते असे काकुआजी सांगत होती.
जेवून होते तर मामा आला. त्याने आल्या आल्या स्वत:चा शर्ट काढून टाकला आणि मला पण उघडा केला आणि आईला म्हणाला जरा त्याच्या अंगाला ऊन, हवा लागुदे, तिकडे मुंबईत सारखे कपड्यात गुंडाळलेलेच असता. नंतरचे तिनही दिवस मी नुसती चड्डी घालुनच असायचो कारण मला आईने शर्ट घातला रे घातला की मामा तो काढुन ठेवायचा मग मग आईने पण नाद सोडून दिला.

चिपळूणच्या घरी एक मस्त माउ होतं. मी सारखा त्याच्या मागुन फिरायचो. मला बघितलं की ते पळुन जायचं म्हणून ते झोपल की मी हळुच त्याच्या जवळ जावुन बसायचो. किती मऊ होते ते माउ.
संध्याकाळी आई आणि मी घराजवळच्या हम्मांच्या घरात गेलो खरी खुरी हम्मा बघायला. तिथे चार हम्मा होत्या दोन मोठ्या दोन छोट्या. मी पहिल्यांदा बघितल्या हम्मा. मला आपले माउ आणि भू भू च जास्त आवडतात.
दुसर्‍या दिवशी उठल्यावर पाहिलं मामी अंगण्यात कसली तरी चित्र काढत होती. मी पण जावुन तिला मदत केली.

आज मी एक सगळ्यात मोठं फळ पाहिलं ’फणस’ घराच्या दारातच झाड होतं, माझा हात पोचेल एवढ्या जवळ फणस लागले होते त्याला.
आज दुपारी मावशीचे केळवण झाले. खुपमस्त सजावट केलेली आणि खुप सारे पदार्थ पण होते. आता मी सांगत नाही तुम्हीच बघा,
संध्याकाळी आम्ही डोंगरात फिरायला जावुन आलो. तिथे किती झाडं बघितली आंबा, काजु, फणस, कोकम, जांभुळ, बकुळ. पहिल्यांदा झाडाला लागलेला अननस पाहिला.

नंतर आईच्या आत्याकडे, मावशीकडे, मैत्रिणींकडे, आईच्या शाळेतल्या शिक्षकांकडे असे अनेक जणांच्या घरी जावून खाउन पिउन मज्जा मज्जा करुन आम्ही घरी परत आलो. हे पहा झाडांतून डोकावणारे आमचे चिपळूणचे घर.



१७ टिप्पण्या:

  1. अरे आर्यन मस्तच... खुप खुप मजा केली रे तू...हम्मा पेक्षा भु-भु आणि माऊच बरे का...? :-)

    चिपळुनचे झाडातले घर मस्तच बरे का...

    उत्तर द्याहटवा
  2. आनंददादा,
    खूप मज्जा केली. माउ आणि भू भू हम्मासारखे मोठे नाहियेत त्यामुळे ते बरे.
    पावसाळ्यात खुप मस्त असत चिपळूणला , आई म्हणते.

    उत्तर द्याहटवा
  3. पुढल्या वेळेस मला पण घेउन जा.. :) एकट्याने मजा करायची नाही अशी..

    उत्तर द्याहटवा
  4. वा आर्यन. म्हणजे २-३ दिवस तुझा सल्लुभाय झाला होता तर मामाच्या संगतीत :-)

    उत्तर द्याहटवा
  5. आर्यन तू मे महिन्यात परत आंबे खायला मामाकडे जाणार आहेस का?? मग मला पण येता येईल आणि यावेळी आपण सगळा कोरेमधला खाऊच खाऊ आधी..घरचा डब्बा बंद....

    उत्तर द्याहटवा
  6. महेंद्रकाका,
    पुढच्यावेळी बाबा, तुम्ही आणि मी असे तिघेच जावुया, आई कटाप. म्हण्जे मग no restriction मज्जाच मज्जा.
    आर्यन

    उत्तर द्याहटवा
  7. हेरंबदादा,
    होय रे. मामा, काकाआजोबा सगळे तर रोजच सल्लुभाय.

    उत्तर द्याहटवा
  8. अपर्णाताई,
    चालेल आपण मे महिन्यात परत जाउया जेवणा ऐवजी नुसते आंबेच खायचे, आणि हा प्रवासात खायला घरुन काहिहि न्यायचे नाही .

    उत्तर द्याहटवा
  9. आर्यन कसली धमाल केली आहेस...फणस, आंबे, जांभुळ मजा आहे की!! अरे मला कधी नेणार आहेस चिपळूणला??? अरे हो केळवण तर खूप मस्त झालेल दिसतय..

    उत्तर द्याहटवा
  10. झाडाला लागलेला अननस !! kya baat hai !! amhi ajun tevhde nashib van nahi !! agdai lahan pan khedyat jaun suddha ! .. good keep it up !!

    उत्तर द्याहटवा
  11. मनमौजीदादा,
    सॉलिड धमाल केली. अरे आता कच्चे आहेत फणस, आंबे, वगैरे. पिकायला लागलेकी जाउ आपण, नक्की

    उत्तर द्याहटवा
  12. हो, बर्‍याच जणांनी पाहिले नव्हते अननसाचे झाड. आईला नेहेमी वाटत, लहानपणीचा थोडा काळ तरी खेडेगावात घलवला पाहिजे नाहितर खुप छोट्या छोट्या आनंदान आपण मुकतो.

    उत्तर द्याहटवा
  13. आर्यन, गेल्या पंधरा दिवसांच्या गोंधळात तुझ्या सगळ्या पोस्ट वाचायच्याच राहून गेल्या नं... सॉरी... अरे वा! मज्जाच मज्जा केलीस की. केळवणाचा थाटमाट पाहून मस्तच वाटले. उघडाबंब्या आर्यन अगदी गोड दिसतोयं... :)

    उत्तर द्याहटवा
  14. असुदे श्रीताई, राहिल्या तर राहिल्या एवढ काय त्यात.
    हो, खुप मज्जा केली चिपळुणला. तिन दिवस नुसती खादाडी केली. तिकडे सगळे मामा, काका उघडेच फिरतात फक्त शॉर्टस घालतात :)

    उत्तर द्याहटवा
  15. अरे वा धमालच केली की आर्यनने... अरे पण रस्त्यात आमचे रोहे लागले का तूला.. आठव बरं पटकन....

    उत्तर द्याहटवा
  16. खुप धमाल केली तन्वीमावशी.
    अरे हो! रस्त्यात तुमचे रोहा लागले ना.

    उत्तर द्याहटवा