समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

मंगळवार, एप्रिल १३, २०१०

’केळकर गुरुजी’

आई आणि रविनाताईचे आपापसात काहितरी बोलणे झाले. रविनाताई जिला मी ’ता’ म्हणतो, ती प्रचंड खुश झाली. मला कळेना असं आईने हिला काय सांगितलं.


दुसर्‍या दिवशीच मला कळलं, या दोघी माझ्यावरच काहितरी प्रयोग करणार आहेत. त्यांच एकमत होत नव्हत, काय बर करुया ह्याला? कृष्ण करुया, रामदास स्वामी, की दुसरं काहितरी. ता म्हणाली कृष्ण करुया, आईला ते फारसं पटलं नाही कारण मी टोपरं, टोपी, फुलांचा, पुठ्ठ्याचा मुकुट यापैकी काहीही २ सेकंद सुद्धा डोक्यावर टिकुन देत नाही. बिना मोरपिसाच्या कृष्णाची आईला कल्पना करवेना. तसेच हातातली बासरी कंटाळा आला तर मी मधेच कुठेही फेकून देण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. त्यामुळे मला कृष्ण बनवण्याची कल्पना कॅन्सल झाली. आता याला काय बनवावा बरे, असा विचार सुरु झाला.



तेव्हढ्यात मला नविन आणलेल्या धोतीची आईला आठवण झाली. एकदम खुश हॊऊन ती म्हणाली आपण आर्यनला ’भटजी’ करुया. धोतर आहे, एक जानवं घालुया की झाले ’केळकर गुरुजी’ तयार. ठरलं.



बाबांनी या कल्पनेला एकदम तुच्छ ठरवले, पण आईने त्याकडे लक्ष दिले नाही.
मग माझी आजीकडे रोज पाच - दहा मिनीटे प्रॅक्टीस सुरू झाली. धोतर नेसायचे आणि हॉलमध्ये फिरायचे. मजा यायची मला. मी चांगला चालत असे धोतर नेसून. शनू, चाल असे म्हटले की एकदम स्पीडमध्ये चालायला सुरुवात, थांब म्हटले की मी आहे तिथे थांबत असे.














कधिकधि दमून मी असा बसून राही मग मला छान खाऊ दिला जायचा.
मी मधेच भाषण देण्याच्या पावित्र्यात उभा राहून मूक संवाद पण म्हणून दाखवीत असे आणि सगळे टाळ्या पण वाजवायचे.














बाबांना पण प्रॅक्टीसच्या गमती सांगून आईने फोटो दाखवले. फोटो बघून बाबा म्हणाले वा! आर्यन पॉश भटजी आहे, एकदम बॉडीफिट टि-शर्ट वगैरे घातलाय.
आईने सांगितले, मला मिळालेल्या बक्षिसाचे आई, ता आणि मी आईसक्रीम खाणार.
बाबा म्हणाले, नाही! ते पैसे त्याच्या बॅक अकाउंट मधे जमा केले जातील.
आई - त्याच्यावर आम्ही मेहेनत घेत आहोत तेव्हा बक्षिसाचे काय करायचे ते आम्ही ठरवणार.
बाबा - मी आर्यनचा फायनान्स मॅनेजर आहे तेव्हा मी ठरवणार त्याच्या बक्षिसाचे काय करायचे ते.
अशाप्रकारे मला न मिळालेल्या बक्षिसावरून आईबाबांचे भांडण पण झाले.



त्यानंतर मधेच कहानीमे एकदम ट्विस्ट आला. कारण आजीने एक फतवा काढला, एवढा लहान माझा नातू त्याला काही स्पर्धेत भाग घ्यायला नकोय. अशाप्रकारे माझी प्रॅक्टीस पण बंद झाली. बरं झालं नाहितरी त्या धोतरात मला अडकल्यासारखच व्हायचं.



ता ला मात्र प्रचंड वाईट वाटलं. कारण तिने सोसायटीमधे सगळ्यांना सांगून टाकलं होतं, आमचा आर्यन पण भाग घेणार आहे, वगैरे वगैरे. त्यामुळे मी स्पर्धेत भाग घेणं हा तिच्या प्रेस्टीजचा प्रश्न झाला होता.



शेवटी तो दिवस आला. सगळी मुलं काय काय बनली होती कोणी कृष्ण, कोणी विठोबा, कोणी बटाटा, कोणी परी, कोणी न्युज पेपर, कोनी नवरी, कोणी नेता. मी कोणीच नाही बनणार म्हणून ता खूप दु:खी झाली होती. प्रेक्षकांत बसलेले असतानाच ती आईला म्हणाली चला ना आपण आर्यनला भटजी करूया. बहुतेक आईला पण वाटल, आपल्या मुलाने स्टेजवर बागडावं.

ता ने धावत जाउन माझे वेषभूषेचे सामान आणले. पाच मिनिटात मला धोतर नेसवण्यात आलं आणि जानवं गळ्यात घालून मी आईबरोबर स्टेजवर कधि पोचलो ते मला कळलं सुद्धा नाही.
माझा स्टेज पफॉरमन्स पहायचाय, हा बघा,


२२ टिप्पण्या:

  1. युवराज आर्यन ... काय मस्त दिसता आहात तुम्ही... ह्या ७ नंबरच्या बोन्ड जर्सी आणि धोतर मध्ये... :) आम्हाला धोतर नेसून आता ३ वर्षे होउन गेली... आता बहुदा २१ मे रोजी... :)

    उत्तर द्याहटवा
  2. टी शर्ट मधील भटजी बुवा . . .तुम्ही तर मस्तच दिसताय!!! बाबांनी बक्षीस दिल की नाही तुला??? बर केळकर गुरुजी आमच्याकडे कधी येताय???

    उत्तर द्याहटवा
  3. रोहनदादा, ७ नंबरचा बॉंड जर्सी हे फक्त प्रॅक्टीसपुरते होते, स्टेजवर उघडाबंब केले मला :)
    २१ मे ला काय रे आहे?

    उत्तर द्याहटवा
  4. अपर्णाताई,
    मज्जा कसली धोतर म्हणजे अडकवणं आहे नुसतं, अजिबात पळता येत नाही की काही नाही.

    उत्तर द्याहटवा
  5. मनमौजी,
    बाबांनी दिल ना बक्षिस.
    तुमच्याकडे येइन ना, श्रावणात लघुरूद्राला :)

    उत्तर द्याहटवा
  6. अरे व्वा...मस्तच आहेत भटजीबुवा...धोतर,जानवे पण शोभतेय एकदम....

    उत्तर द्याहटवा
  7. तन्वीताई,
    धन्यवाद!
    अक्षरश: आयत्यावेळी दोन मिनीटात त्याला तयार करून स्टेजवर नेले. पण व्हिडीओ पहाताना वाटते बरं झालं नेले. आयुष्यभरासाठी एक चांगली आठवण तयार झाली.

    उत्तर द्याहटवा
  8. अरे वा. kids' king उर्फ आर्यन भटजी उर्फ केळकर गुरुजी.. आता श्रावण जवळ आला ना .. मज्जा आहे ब्वा भटजींची.
    आत्ता हापिसात असल्याने व्हिडीओज बघितले नाहीयेत. घरी जाऊन बघतो. पण तुझे गोडगोड फोटोज बघून प्रतिक्रिया टाकल्याशिवाय राहवलं नाही !! रात्री व्हिडीओज बघून पुन्हा टाकतो प्रतिक्रिया :-)

    उत्तर द्याहटवा
  9. गोडच दिसताय तुम्ही भटजीबुवा... आणि बॅकग्राउंडला हे 'फॅशन' का जलवा काय... ;-)

    उत्तर द्याहटवा
  10. वाह भटजीबुवा..काय गोड दिसताय :) तुमचा स्टेज वरचा पर्फॉर्मेन्स पण झ्याक....आवडला. खूप ग्गोड ग्गोड ग्गोड दिसतोयस बेटा ..

    उत्तर द्याहटवा
  11. हेरंब,
    केळकर गुरुजींचे मंत्र गुणगुणतच म्हटले जातात अजुन, कोण बोलावणार गुणगुण्या भटजीला :)
    व्हिडीओ पहा सावकाशीने.

    उत्तर द्याहटवा
  12. आनंद,
    सोसा. कार्यक्रमातील फॅशन शोच होता हा, त्यामुळे फॅशनचा जलवा!

    उत्तर द्याहटवा
  13. सुहासदादा, आहे की नाही मी स्टेज पफॉरमर?

    सागरदादा, पिल्लु भटजी :)

    उत्तर द्याहटवा
  14. भटजीबुवा खुपच गोड दिसता हो तुम्ही... वेळेवर पण मस्त परफ़ोर्मन्स दिलास आर्यन, छान...बाकी आजीने यासाठी तुझ्या आईला कस झापल ते नाही सांगीतलस... :)

    उत्तर द्याहटवा
  15. देवेंद्रदादा,
    आजी बिलकुल नाही रागावली, उलट माझा परफॉमन्स बघुन जाम खुश झाली.

    उत्तर द्याहटवा
  16. काय भटजी बुवा.. किती ठिकाणी पुजा सांगून आलात? खूपच गोड दिसता हो तुम्ही.. आणि पर्फॉर्मनस तर एकदम बेस्ट.. :)

    उत्तर द्याहटवा
  17. वा वा.. व्हिडीओज पण सुंदरच आहेत. तू काय दंडवत घातलास का मधेच प्रेक्षकांना ? :-)

    उत्तर द्याहटवा
  18. महेंद्रकाका, थॅक्यु!
    आयत्यावेळी माझ्या मनाने केलेला पर्फॉमन्स होता, आईने काही सांगितले नव्हते.

    हेरंबदादा,
    हो, चांगला डोकं टेकवून नमस्कार केला प्रेक्षकांना.

    उत्तर द्याहटवा
  19. आयला झकास रे. आयत्यावेळी करूनही केळकर भटजी एकदम सहीच जमले की. आणि आत्तापासूनच प्रेक्षकांची नाडी बरोबर हाती लागलीये की तुझ्या... :)गुरूजी आता लवकर आमच्या घरी या बरं का...

    उत्तर द्याहटवा
  20. श्रीताई,
    :)
    आई बाजुलाच उभी होती म्हणून सगळ्या गमजा.
    तुमच्या घरी ना, येतो की काय करायचयं बोला, सत्यनारायण की सत्यविनायक?

    उत्तर द्याहटवा