आईबरोबर सगळे खादाडीचे ब्लॉग वाचताना एक गोष्ट जाणवली सगळे जण खाऊच्या पदार्थांचे फोटो टाकतात, कृति कशी करायची ते सांगतात, कुठल्या हॉटेलात मिळेल ते पण सांगतात. पण खायचा कसा ते सांगत नाहीत की फोटोत दाखवत पण नाहीत. म्हणून आज मी ते काम करणार आहे.
हा फोटो पहा, मी माझा आवडता ’टोमॅटो सॉस’ खात आहे. मला सॉस एव्हढा आवडतो की प्लेटमधे ’टोमॅटो सॉस’ सोडून दुसरा कोणताच पदार्थ नाहीये. तसेच बरोबर अख्खी सॉसची बाटली ठेवली आहे. म्हणजेच आवडत्या पदार्थाचा मनमुराद आस्वाद घ्यावा. खाताना तो पदार्थ आपल्या बोटांना, तळहाताला, ओठांच्या बाजुला, स्वत:च्या कपड्यांना, फरशीला, आजुबाजुच्या वस्तूंना, माणसांना लागला तरी हरकत नाही. घरातली माणसं स्वत:सकट सगळ्यांना स्वच्छ करतात.
कोणताही पदार्थ वाया घालवू नका. आई म्हणते, शनू, फरशीवर पडलेली वस्तू तोंडात घालू नको. धुळ आणि किटाणू लागतात त्याला, आजारी पडायला होतं. मी ते मानत नाही, तोंडातून पडलेली बडीशेपची गोळीसुद्धा मी परत चिमटीने उचलून तोंडात भरतो. कारण मी ती गोळी जर टाकून दिली तर मुंगी ती गोळी खाते. जर खाली पडलेली गोळी खाऊन मुंगीला काही आजार होत नाही तर मला कसा होईल? पण अजुन बोलता येत नसल्याने मी हे आईला विचारू शकत नाही.
मला डीशमधे खायला दिलेले चुरमुरे तर मी मुद्दामुन खाली ओततो. मग पंख्याच्या वार्याने ते सगळ्या घरभर उडतात, त्यांना शोधून शोधून पकडून खाताना खूप मज्जा येते आणि वेळ पण चांगला जातो.
मी सगळे खाऊ डाव्या व उजव्या दोन्ही हातांच्या बोटांनी खातो, असे केल्याने कमी वेळात जास्त खाऊ खायला मिळतो. चमचा मी फक्त पोट भरले असेल आणि खायचा कंटाळा आला असेल तर ताटलीतल्या खाऊत खेळायला वापरतो. कारण ताटलीतला पदार्थ चमच्यात उचलून तोंडापर्यंत नेइस्तोवर अर्ध्या रस्त्यात कुठेतरी पडून जातो आणि आई समोर असेल तर तो पडलेला खाऊ ताटलीत परत पण येत नाही. मुंग्यांना खायला मिळतो उगाचच.
आई जेव्हा खाऊ डीशमधे काढून देत असते तेव्हा त्या खाऊची जागा नीट बघून ठेवायची म्हणजे स्वत:ला जेव्हा हवा असेल तेव्हा त्या जागेकडे, डब्याकडे बोट दाखवून, मान हलवून हलवून तो खाऊ मिळवता येतो.
हॉटेलमध्ये गेल्यावर नेहेमी सगळ्या खाऊंची चव बघायची, कारण आई बाबा मागवतात ते सगळे खाऊ खूप छान असतात. मला तिखट लागेल म्हणून माझ्यासाठी नेहेमी साधा डोसा मागवला जातो पण मी थोडासा डोसा खाऊन, आई बाबांच्यातले पण खातो. त्यांनी दिले नाही तर जोरात रडतो. मग आपोआप मला पाहिजे ते मिळते. पण चुकुन शेजवान न्युडल्स असतिल तर मात्र जाम वाट लागते. खोकला लागतो, नाक डोळे लाल लाल होतात, नाकातुन पाणी येते. पण एक बरं, आईच्या पर्समधे नेहेमी एक साखरपाण्याची बाटली असते माझ्यासाठी.
रात्री जेवण झाल्यावर लगेच झोपायचे नाही. नाहीतर रव्याचा लाडू, नारळाची वडी, आंब्याचे साठ, चॉकोलेट केकची पेस्ट्री, आईसक्रीम अगदी काही नाही तरी सफरचंद, केळं ही फळे यांसारखे उत्तमोत्तम पदार्थ खायचे राहून जातात. हा परवाचा माझा फोटो पहा, चॉकोलेट लाव्हा खातानाचा,
तुम्हा सगळ्यांना पण असाच छान छान खाऊ खायला मिळो!
खादाडी राज्याच्या छोटुश्या युवराजांचं खादाडी राज्यात स्वागत असो !! खाऊ कुठेही असो ताटलीत की जमिनीवर, पण तो खायचाच हा तुमचा नियम आम्हाला फार आवडला.. आपण सच्चे खादाडीभक्त आहात :-)
उत्तर द्याहटवाआणि हो चॉकलेट लिपस्टिकचा फोटो छानच आला आहे :-)
बरोबर मुद्दा हेरलास तू...खाता कसे हे कुणी सांगतच नाही....
उत्तर द्याहटवाअन हेरंब म्हणाल्या प्रमाणे आपण खरे खादाडी भक्त आहात...
सॉस वाला फोटू एकदम झकास..........
आता पाहिलं की तुझ्या ब्लॉग ला १००० वेळा भेट दिली आहे सर्वांनी ...असाच लवकर मोठा हो व लवकर १००००० पूर्ण कर....(मी १०००वा बर का!)
उत्तर द्याहटवावा..वा..!!! हे सर्व बघून वाचून आम्हास मनी अतीव आनंद जाहला.. ही मोहिम आटपून आम्ही तेथे आलो की युवराज आर्यन यांची भेट घेऊ इच्छितो... आपले काय म्हणणे आहे यावर ??? :)
उत्तर द्याहटवाआर्यन राज्याच्या भावी 'खादाडी राज्याच्या राजा’ आणि ’अष्टप्रधान मंडळा’ च्या वारसदारीची धुरा तुझ्यासारख्या कर्तबगार आणि खादाड प्रिय पिढीच्या हातात पडत असल्याने आम्हा सर्वांची काळजी मीटली. रोहन राजे तुमच्या पदाला ह्याहून एलिजिबल उमेदवार नाही.
उत्तर द्याहटवासोनाली, १००० वाचक संख्या पूर्ण झाल्या बद्दल अभिनंदन.
सुहासच्या वाक्याला अनुमोदन, उमेदवार मिळाला....
उत्तर द्याहटवाखादाडी राज्याच्या न्यायाधिशा (हेरंबदादा), या सगळ्या गोष्टी पुराव्या सकट तुमच्याच घरात तुम्हाला पहायला मिळतील.
उत्तर द्याहटवाहो की नाही सागरदादा, खायचे कसे याला पण महत्व आहे. प्रत्येकाची एक स्टाईल आहे.
उत्तर द्याहटवाफोटोग्राफी आईका कमाल :)
सेनापति, युवराज तर राजासकट सर्व अष्टप्रधान मंडळास भेटण्यास उत्सुक आहेत, तरीही सेनापति या नात्याने आम्ही आपणास समक्ष भेटायला येण्याचे करू.
उत्तर द्याहटवासुहास, हे गुण आमच्या मातोश्रींमुळे आमच्यात आले आहेत. त्यांना शॉपिंगला गेल्यावर खरेदीच्या आधि लगेच भुक लागते, त्यामुळे बाबा घरून खाऊन पिऊन निघण्याचा आग्रह धरतात नेहेमी.
उत्तर द्याहटवाआनंद, धन्यवाद!
खाबुनँदन तुमचे स्वागत आहे.फोटो एकदम छान आहेत आणि त्याचे विचार ऐकुन खुप मजा वाटली.
उत्तर द्याहटवाही ही ही
उत्तर द्याहटवाशमुमावशी Thanks!
आर्यन
उत्तर द्याहटवाअतिशय आनंद झाला, आता आम्ही रिटायर व्हायला हरकत नाही.. मस्त आहे रे शेवटचा फोटो..
आजच ब्लॉगर्स मीट च्या संदर्भात प्रमोद वैद्य काकांच्या घरी मिटींग झाली. वृत्तांत लवकरच समजेल तुला. ब्लॉगर्स मीट मधे सगळ्यात वयाने लहान ब्लॉगर म्हणुन तुझा सत्कार करु आम्ही.. नक्की ये!!
महेंद्रकाका,
उत्तर द्याहटवातुम्ही रिटायर होण्याची भाषा बिलकुल करू नका, तुमच्या मोलाच्या मार्गदर्शनाची पदोपदी गरज पडणार आहे.
अरे वा! झाली का पहिली मिटींग. माज़ा सत्कार, I am honoured. मी माझ्या आई बाबांना घेवून नक्की येइन.
आर्यन
युवराज आर्यन ....तू तर सगळ्यांची चिंता मिटवली. राजे रोहन तर खुश झाले असतील. . .अरे तुझा तो दुसरा फोटू एकदम मस्त आहे बर का!!! चालू दे अशीच खादाडी!!!
उत्तर द्याहटवाही ही ही
उत्तर द्याहटवासगळे तेच म्हणत आहेत.
अरे वा! खादाड राज्याचा युवराज तयार होतोय तर..... सहीच. बाळराजे, अफलातून फोटो आलेत बरं का... मस्तच. कान कर इकडे... तुला माहीतीये मला पण कधीतरी असेच खायला आवडेल.मनसोक्त... पण सगळे हसतील ना....
उत्तर द्याहटवाथॅंकु थॅंकु श्रीताई!
उत्तर द्याहटवाअगं तुला जर असे खायला आवडते तर तू जेव्हा एकटी असतेस घरी तेव्हा खात जा की :)
युवराज....लगे रहो....रात्रीची खादाडी पण सोडत नाही ही ही ही....ब्लॉगर्स मीटला आमच्यासाठी ती चॉकोलेटची लिपस्टिक घेऊन येनाल का???नाहीतल लावुनच ये.....
उत्तर द्याहटवाअपर्णाताई, एक काम करू तू येताना चॉकलेटची लिपस्टीक घेवून ये माझ्यासाठी आणि तिथे आपण ती लावू :)
उत्तर द्याहटवाखादाडी राज्याच्या युवराजांचे विचार पटले बुवा आपल्याला....आर्यन फ़ोटो अगदि गोड आहे हो....
उत्तर द्याहटवाधन्यवाद देवेंद्रदादा!
उत्तर द्याहटवाकसले सही आहेत फोटो...खादाडी राज्याचे युवराज!!!! सही आहात तुम्ही!!
उत्तर द्याहटवातन्वीमावशी,
उत्तर द्याहटवाअगं होतीस कुठे तु?
फोटोग्राफी, आमच्या मातोश्रींची मेहेनत :)