आई म्हणते, माझा आणि बाबांचा जिव्हाळ्याचा विषय एकच आहे 'झोप'. ते खरं ही आहेच म्हणा. आम्हाला कधिही, कुठेही, कशीही झोप लागते.
बाबांनी गाडी सुरु केली आणि AC चा गार गार वारा लागला की माझे डोळे आपोआप जड व्हायला लागतात आणि मी झोपेच्या स्वाधीन होतो.रात्री सुद्धा कधि कधि अंगा घालेपर्यंत मी ढाराढूर झालेला असतो. मग आई मला झोपेतच उलटा पालटा करून झोपायचे कपडे घालते आणि असं इस्त्रित झोपवते.
मागे एकदा शॉपिंग करायला आई आणि मावशी मला मोठ्या हौसेने बिग बझार मध्ये घेवून गेल्या. गर्दी कमी असेल म्हणून आम्ही सकाळी साडे दहा वाजताच तिथे पोचलो. मी पण नुकतीच आंघोळ केली होती, गरम गरम दु दु प्यायले होते. तिथे आत छान गार हवा लागत होती. झालं, व्हायच तेच झालं, ब्रह्मानंदी लागली टाळी. आता मला असं झोपलेलं उचलून घेवून शॉपिंग कसं करणार? म्हणून माझे थोडे फोटो काढून दोघी बिचार्या अकरा वाजताच घरी वापस :)
कधि कधि मी रूसुन सोफ्यावर उलटा पडून रहातो आणि त्या मऊ मऊ सोफ्यावर रंगित फुलं बघताना मी विसरूनच जातो की मी रूसलोय आणि मला झोपच लागते तिथे,
मी आणि बाबा टीव्हीवर गाण्यांची व्ही सी डी बघत होतो, छान छान गाणी आहेत त्यात. चांदोबा चांदोबा भागलास का? शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा, माऊची पिल्ले, बेडकीच्या पिल्लाने बैल पाहिला. इतकी मस्त गाणी होती पण नेहेमीप्रमाणेच झाल. आई जेव्हा हॉलमध्ये बघायला आली तेव्हा बाबा गाणी ऐकत होते आणि मी तर केव्हाच,
माझ्या आईला 'ओपन हाऊस'ची पावभाजी खूप आवडते म्हणून आम्ही एका शनिवारी तिथे गेलो होतो. माझ्यासाठी साधा डोसा मागवला होता कारण नाही तर मी आईला पावभाजी खाऊन दिली नसती. डोसा पटकन बनतो वाटतं, पहिला तोच आला टेबलवर. मी थोडा थोडा खात होतो. पोट भरत आलं तसे डोळे आपोआप मिटायला लागले. आजी नेहेमी म्हणते, जेवल्या जेवल्या झोप येते कारण अन्नाचा सुद्धा कैफ येतो. मला पण बहुतेक तसच झालं. नशिबाने शेजारचे टेबल रिकामे होते त्यामुळे मी त्याच्यावर अशी ताणून दिली आणि आईने पण पावभाजी नक्कीच एन्जॉय केली असणार.
आता सुद्धा मी झोपलेला आहे म्हणून आई हे लिहू शकली, कळलं ना!
सुखी प्राणी आहेस बाबा तू.....अन झोपण्याची पद्धत तर फारच छान ..
उत्तर द्याहटवाआईला सांग पोस्ट छान झाली आहे म्हणून...अन हो आमचे मेस वाले काका म्हणायचे सगळ्यात मोठी नशा हि जेवणात असते म्हणे....
धन्यवाद सागर!
उत्तर द्याहटवाकालच पाहिलं पोस्ट, पण कॉमेंट आज टाकतोय. नशिबवान आहेस रे बाबा. इकडे तर झोपेचं पार खोबरं झालं आहे. सकाळचे तिन वाजल्यापासुन जागा आहे. कामाच्या चिंतेने झोप येत नाही..
उत्तर द्याहटवाफोटॊ खुपच मस्त आले आहेत- नेहेमी प्रमाणेच..
अग बाई,मस्त ब्रम्हानंदी लागतेय गं आर्यनची. खरेच तू सुखी आहेस. नाहीतर आमचे भूत... रात्री दोन दोन वाजता बाबा रिक्षातून फिरवायचा तेव्हां झोपायचा गाढ. रिक्षा थांबली की पुन्हा भोकाड. मी आणि तो कायमचा मुक्काम झोपाळ्यावर...:) आर्यनचे फोटो अप्रतिम आलेत.
उत्तर द्याहटवामहेंद्रकाका,
उत्तर द्याहटवातुम्ही comment दिलीत ना बास! माझ्यापेक्षा सगळे आईलाच नशिबवान म्हणतात, मी रात्री नीट झोपतो म्हणून.
तुम्हाला जर अशी मधेच जाग येत असेल तर किचनमध्ये जावून काहितरी खात जा, अन्नाचा कैफ येइल आणि तुम्ही मस्त झोपाल, आजी सांगते.
तुम्ही आईचे काका म्हणजे माझे काकाआ. ना! :)
श्रीताई,
उत्तर द्याहटवाखरचं मी सुखी. एकेकांचे अनुभव ऐकले की कळतं. रात्र रात्र जागवतात काही बाळं, त्यांची किती वाट लागत असेल.
आर्यनला पण रिक्षेत लगेच झोप लागते वारा लागला की.
आर्यन, किती गोड दिसतोस रे तू. एकदम छान. असंच छान छान झोपायला तुझ्या आदितेय नावाच्या मित्राला पण शिकव ना रे प्लीज.
उत्तर द्याहटवाधन्यवाद हेरंबदादा!
उत्तर द्याहटवाआदितेयला आमच्याकडे पाठव मग मी शिकवेन त्याला सगळं :)
"इस्त्रित झोपवते" :) aani rusun baslyvar zopaychi estyle farch chan !! fakta two wheeler bhatakanti aslyas jaga raha baraka .. nahitar aai la sang jaga thevyala !
उत्तर द्याहटवाGod bless
Vikram
जगी सर्व झोपी (सुखी) असा कोण आहे..आर्यन अजुन कोण. खूप shweeet दिसतोयस.
उत्तर द्याहटवाझोपेच आणि माझ वाकडच कारण मी नाइट शिफ्ट करतो. आता तुला बघून मला मस्त ताणून द्याविशी वाटतेय हापिसात...ZZzzzzz
विक्रमदादा ब्लॉगवर स्वागत!
उत्तर द्याहटवानाही नाही बाईकवर मी कसा झोपेन, मी तर बाबांच्या पुढ्यात बसतो टाकीवर दोन्ही हात ठेवून. खूप आवडते मला.
सुहासदादा,
उत्तर द्याहटवाThank you! झोपेच आणि माझं भलतच सख्य :)
अरे आर्यन ह्या बाबतीत आपल्या दोघांचे एकमत आहे. इकडे ओफिसमध्ये मलापण खूप झोप येत होती म्हणून तुला भेटायला आलो तर तु झोपलास!!
उत्तर द्याहटवाअरे काय करू, झोपेवर माझा अजिबात control नाही.
उत्तर द्याहटवाआर्यन
ब्लॉगवर स्वागत!
सोनाली
अपुनको भी ये सोना सोनेसेभी प्यारा है ...
उत्तर द्याहटवाआर्यन झोपायच्या स्टाइलस ही भारी आहेत बुवा तुझ्या....
देवेंद्रदादा,
उत्तर द्याहटवाझोप आली की मी कधिही, कसाही आणि कुठेही आडवा होतो.