समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

सोमवार, मार्च १५, २०१०

शुभेच्छा!

उद्या गुढी पाडवा आहे. मी आज रात्री तलावपाळीवर आतषबाजी बघायला जाणार. उद्या सकाळी स्वागतयात्रेला जाणार आणि दुपारी श्रीखंड पुरी खाउन मस्त झोपणार. म्हणून कदाचित मला वेळ होणार नाही तर मी आजच तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.
" हे नविन वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुखा समाधानाचे, आरोग्यदायी आणि आनंदाचे जावो."
तुम्हाला पण स्वागतयात्रा बघायची आहे, या माझ्यामागून,



१० टिप्पण्या:

  1. सोनपिवळा स्पर्श हिरव्या गर्दिला स्रूजनांचा हर्ष
    कुणाच्या स्वागता हा सोहळा? गुढीपाडव्याचा मुहुर्त आगळा,
    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

    उत्तर द्याहटवा
  2. सुहास,
    नक्षिदार काठीवरी रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा, उभारूनी मरठी मनाची गुढी, साजरा करूया गुढीपडवा!
    सोनाली

    उत्तर द्याहटवा
  3. "श्रीखंड पुरी रेशमी गुढी लिंबाचे पान नववर्ष जावो छान " :).

    उत्तर द्याहटवा
  4. आर्यन, तुला व आईबाबांनीही हे वर्ष खूप सुखासमाधानाचे जावो. आता आपण लवकरच भेटू.:)

    उत्तर द्याहटवा
  5. श्रीताई,
    अरे वा! लवकरच भेटू म्हणजे येताय वाटत भारतभेटीला.
    नविन वर्षाच्या शुभेच्छा!
    सोनाली

    उत्तर द्याहटवा
  6. सोनाली केळकरमार्च १७, २०१० ४:१६ PM

    सागर,
    धन्यवाद!
    नविन वर्षाच्या शुभेच्छा!

    उत्तर द्याहटवा
  7. काय काय पाहिलं ते लिहिलं नाहीस आतिशबाजी मधे?

    उत्तर द्याहटवा
  8. आतषबाजीच्या इथे चौकोनी डबे होते आणि मोठ्या मोठ्या नळ्या ज्यातुन फाट फाट असा आवाज येत होता त्यामुळे मी बाबांच्या खांद्यावर डोकं ठेवून डोळे घट्ट मिटून घेतले होते. मला काहीच दिसले नाही. मग कसे लिहिणार?

    उत्तर द्याहटवा
  9. आर्यन, अरे उशीर झाला तुला शुभेच्छा द्यायला. सॉरी. पण तरीही गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.. खूप मोठ्ठा हो.

    उत्तर द्याहटवा
  10. हेरंबदादा Thanks!
    तुम्हाला आणि आदितेयला पण गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा