समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

सोमवार, मार्च २२, २०१०

New look


देवाने मला जन्मतःच असा हेअर कट देवून पाठवले असल्याने मी एक वर्षाचा होउन गेलो तरी माझ्या केसांना कोणी कात्री लावली नव्हती. पण आता मी सव्वा वर्षाचा झालो आणि आता माझ्या केसांची थोडी थोडी वाढ होउन चांगली जुल्फ दिसायला लागली.
आजीचे म्हणणे आता उन्हाळा सुरु होणार असल्याने माझे हे वाढलेले केस कापून बारीक करावे. माझे बाबा आणि आजोबा दोघेही सौंदर्याचे उपासक. त्यांचे म्हणणे, छे! कुठे वाढलेत केस. किती छान कुरळे कुरळे आणि तलम केस आहेत. काय सुंदर दिसतात. दोघांचाही केस कापण्याला तीव्र विरोध.आजीचे म्हणणे, सौंदर्य महत्त्वाचे नाहीये. त्याला किती बरे वाटेल, हलकं होईल डोकं, गरमा कमी होईल, शांत झोप लागेल. मला सांभाळणार्‍या रविनाताई चे पण हेच मत होते.


आईचे मात्र तळ्यात मळ्यात चालले होते, ती कधि आजीच्या ग्रुप मध्ये असायची तर कधि बाबा आणि आबांच्या.

दोन शनिवार, रविवार गेले तरी माझे केस आपले आहेत तसेच. आई बाबांनी काहीच action घेतली नाही. त्यामुळे आता आजीने सूत्र आपल्या हातात घेतली. एका सकाळी ती स्वतः सलूनमध्ये जावून सांगून आली, आमच्या घरी माझ्या नातवाचे केस कापायला या, पहिल्यांदाच कापायचे आहेत म्हणून घरी बोलवत्ये. त्यादिवशी त्या न्हाव्याची वाट बघण्यात माझी आंघोळ संध्याकाळी चार वाजता झाली. पण तो काही आला नाही. दुसर्‍या ग्रुपमधली मंडळी जाम खुश झाली.

आता आजीने दुसरे शस्त्र बाहेर काढले, शुक्रवारी संध्याकाळी तिने जाहीर केले की, या शनिवार, रविवारी जर तुम्ही याचे केस कापले नाहीत तर मी स्वतः तो झोपल्यावर त्याचे वाढलेले केस कापीन. ही मात्रा बरोबर लागू पडली.
दुसर्‍या दिवशी सकाळीच बाबा मला सलून मध्ये घेवून निघाले. जायच्या आधि आईने माझ्या वाढलेल्या केसांचे, डोक्याचे खूप फोटो काढले. तिला वाटत होते न जाणो केस कापल्यावर मी कसा दिसेन. जाताना बाबा सांगून गेले, जर याने खूप आरडाओरडा, रडारड केली तर मी तसाच परत आणीन.
सलूनमधे मोठे मोठे आरसे, AC चा गार वारा, गाणी हे सगळ बघून मला जाम मजा वाटली. माझे पटकन केस कापून झाले. मी अजिबात रडलो नाही. फक्त ते मानेभोवती कापड गुंडाळून दिले नाही मी त्या माणसाला. केस कापून झाल्यावर बाबांना खूप आवडला माझा हेअरकट. सेम त्यांच्यासरखाच होता माझा कट. आई तर जाम खुश झाली आणि म्हणाली, अरे शनु तर अजुनच छान दिसायला लागला, एकदम गुंडु. फोटो काढायला विसरली नाही.


१४ टिप्पण्या:

 1. आर्यन, मी अर्थातच दुसर्‍या ग्रुपमध्ये असल्याने पहिल्या ग्रुपचा निषेध.. किती छान होती रे तुझी आधीची जुल्फं..

  हो पण आताचे फोटो बघितल्यावर तुझ्या आईशी आणि पहिल्या ग्रुपशी सहमत. आता तर शनू अजूनच गुंडूल्या दिसायला लागलाय :-)

  उत्तर द्याहटवा
 2. हेरंब :)
  अरे आम्ही खरच कापायला तयार नव्हतो त्याचे केस, खुप मस्त दिसायचे.

  उत्तर द्याहटवा
 3. आर्यन, हेरंबशी सहमत आहे..तुझी अगोदरची हेयर स्टाइल मस्त होती!!!! तसा तू स्मार्ट आहे त्यामुळे नवीन हेयर स्टाइल मध्ये ही छान दिसतो आहेस!!!

  उत्तर द्याहटवा
 4. मनमौजी,
  धन्यवाद आणि स्वागत माझ्या विश्वात!

  उत्तर द्याहटवा
 5. अरे तू कुठल्याही हेअर स्टाइल मध्ये क्यूटच दिसतोस रे सोन्या....
  Aaryan, ur a sweetheart..God Bless you

  उत्तर द्याहटवा
 6. मी सुदधा दुसरया ग्रुपमधलाच ..पण आताही छान दिसतो आहेस आर्यन...बाकी मी तर अजुनही नेहमीच माझ्या केसावर काहीतरी प्रयोग करत असतो..

  उत्तर द्याहटवा
 7. देवदादा,
  मोठा झाल्यावर मी पण तसेच ठेवीन बहुतेक.

  उत्तर द्याहटवा
 8. अरे हि पोस्ट कशी राहिली माझ्याकडून ... :(
  मी पण तुझ्या बाबा व आजोबांसारखा सौंदर्या उपासक आहे...एकदा कापले तर कापले आता परत नको कापू..खर सांगायचं तर तर दोन्ही स्टाईल मध्ये तू गोड दिसत आहेस रे.....

  उत्तर द्याहटवा
 9. बाळराजे, आम्ही तुमच्याच गटात. तुझे आधीचेच रुपडे गोड गोड होते. म्हणजे कापल्यावरही तू गोडच दिसतो आहेस पण आधी कसा युवराज वाटत होतास..... वाढतील रे आत्ता पटापट....पुन्हा कापायला घेतले की तुझे अस्त्र उपस बरं का...मोठ्ठे भोकाड.....
  ( सोनाली, अग तुझी नुकतीच टाकलेली कमेंट गायबच झाली. :( )

  उत्तर द्याहटवा
 10. चालेल आता खरोखर युवराजासारखे वाढवतोच केस.

  उत्तर द्याहटवा
 11. मी तर कायमच दुसर्‍या ग्रुपमध्ये आहे...तरी आरूषचं पहिलं जावळ काढलं तेव्हा तो एकदम मोठाच(आणि टग्या) दिसायला लागला असं वाटतं..त्यामानाने हा नेहमीसारखाच दिसतोय...आणि सोनाली दृष्ट काढ त्याचे डोळे एकदम सही आहेत....

  उत्तर द्याहटवा
 12. अपर्णा आम्ही त्याचे जावळ काढलेच नाही, त्याला वर्षाचा होईपर्यंत जास्त केसच नव्हते. आणि हो, त्याची आजी रोज काढते त्याची दृष्ट.
  सोनाली

  उत्तर द्याहटवा