समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

सोमवार, मे १०, २०१०

९ मे २०१० @ दासावा

दुपारी दोन ते चार ही माझी झोपेची वेळ आहे. त्यामुळे माझे कपडे कधी बदलले, रोहनदादाच्या गाडीत कसा बसलो आणि दासावा मधे केव्हा पोचलो ते कळलेच नाही. जाग आली तेव्हा दासावाच्या पायर्‍या चढत होतो बाबांच्या हातावर बसुन.आम्ही साधारण सव्वाचारला पोचलो. तिथे दारातच महेंद्रकाका उभे होते, काही दादा आणि एक ताई पण होती कांचनताई. पण माझी त्याच्याशी ओळख नव्हती. त्यांनी मला बरोबर ओळखले. सचिनदादाने एक बॅच दिला आईला, नाव आणि नंबर लिहिलेला. मला पण बॅच हवा होता म्हणून आईने तो माझ्या शर्टला लावला.


आई, बाबा आणि मी पहिल्या रांगेत जाउन बसलो. मी लगेच एक बाटली दुदु पिउन घेतले, मला बरं वाटलं. आमच्याबरोबर रोहनदादाची बायको शमिका होती. तिच्या टच स्क्रिन फोनबरोबर मी खूप खेळलो. त्याच्यामुळे माझी आणि तिची चांगली मैत्री झाली.


हळुहळु सगळे यायला सुरुवात झाली. अमेरिकेची अपर्णाताई आली तिने मला खाऊ दिला आणि एक छोटीशी डबी दिली आहे पण त्यात काय आहे ते मला अजुन कळले नाहीये. मग श्रेयाताई आल्या त्यांनी एक गोळी देउन माझ्याशी दोस्ती केली.


थोड्या वेळाने मी आणि आई मागे गेलो जिथे पुण्याचा सागरदादा, हैद्राबादचा आनंददादा, भारतदादा, देवेंद्रदादा या सगळ्यांना भेटलो.


मधेच एक मुलगी आमच्या इथे आली आणि तिने माझा पापा घेतला. आईला वाटले कोणत्यातरी ब्लॉगरकाकांबरोबर आलेली त्यांची मुलगी असेल तर ती चक्क ’मैथिली थिंक्स’ हा ब्लॉग लिहीणारी माझी मैथिलीताई होती. मी माझ्या ब्लॉगचे विजेटकोड बनवुन देणार्‍या सलिलदादाला पण भेटलो. त्याला फोटोसाठी छान छान पोझ पण दिल्या.कांचनताईने कार्यक्रमाला सुरुवात केली, स्वतःची ओळख करुन दिली. मग प्रत्येक जण आपापली माहिती सांगत होते. माझ्या मनातलं सगळं आईने सांगितलं. स्टेजवर असतानाच महेंद्राकाकांनी सगळ्यात ’लहान’ ब्लॉगर म्हणून मला एक ’मोठी’ कॅडबरी दिली. मला महेंद्रकाका खूप आवडतात.थोड्या वेळाने बटाटेवडा कटलेट असा खाऊ आला. कटलेटचा तुकडा मी खाउन बघितला पण तिखट लागला मला म्हणून मी शमिकाच्या टच स्क्रिनबरोबर खेळायला गेलो. सगळे ताई, दादा, काका, आणि आजोबा स्वतःची ओळख करुन देत होते. आई ऐकत होती. मला जरा कंटाळा आला तेव्हा मी शमिका बरोबर मागे एक फेरी मारून आलो. महेंद्रकाकांच्या डिशमधला थोडासा बटाटावडा पण खल्ला. मला खुप मजा आली दासावामध्ये.


सगळ्यांना टाटा केला, फ्लाईंग किस दिला आणि आम्ही तिथुन थोडे लवकरच निघालो. येताना रोहनदादा बरोबर आल्यामुळे जाताना बसने घरी गेलो. विंडोसिट मिळाली होती मला मस्त झोप लागली. बसमधुन उतरुन आम्ही रिक्षेत बसल्यावर बाबांच्या लक्षात आले माझ्या एका पायात बुट नाहिये. आता कुठे शोधणार? बसमधे, रस्त्यात कुठे पडला कुणास ठाउक?

माझा आवडता बुट्टु हरवला :(

आई म्हणत होती सिंड्रेलाचा बुट्टु पण असाच हरवला होता आणि तो कोणीतरी शोधत शोधत तिला आणुन दिला, माझा पण बुट्टु असा कोणी परत आणुन दिला तर कित्ती बरं होईल.

३९ टिप्पण्या:

 1. अरे वा...आम्हाला पण तू खूप खूप आवडला बर का.

  अरे पण तू ती मोठी कॅडबरी एकट्यानेच खाल्लीस ?
  आम्हाला पण हवी होती न थोडी थोडी..... :)

  -सचिनदादा

  उत्तर द्याहटवा
 2. तू आलास म्हणुन आम्हाला पण खूप मजा आली.. पुढल्यावेळेस पण ये आणि माइक वर मस्त पैकी भाषण दे..

  उत्तर द्याहटवा
 3. सचिनदादा,
  पुढच्या वेळेस मला सेपरेट बॅच हवा.
  अरे हो! कॅडबरी तुम्हाला द्यायची राहिली रे, पुढच्या वेळी नक्की देइन :)

  उत्तर द्याहटवा
 4. सागरदादा,
  थांकु थांकु
  तुम्ही सगळे दादा पण मस्त स्टाईलमध्ये होतात रे, मी पण मोठा झाल्यावर तसाच होणार एकदम स्टाईलमें

  उत्तर द्याहटवा
 5. महेंद्रकाका,
  आपला मेळावा एकदम धमाल मेळावा झाला. खुप मज्जा आली.
  सोनाली
  पुढल्यावेळेस मी नक्की बोलायला लागलो असेन, मीच स्वतःच्या ब्लॉगची ओळख करुन देइन.
  आर्यन

  उत्तर द्याहटवा
 6. अरे,आम्ही आलोच नाई की!! मग आता आपली भेट कधी?
  भेटू तेव्हा कॅडबरीचे नक्की..

  उत्तर द्याहटवा
 7. मज्जा केली तर. पुढच्या वेळी खूप खूप चॉकलेट्स मिळतील एका माणसाला.

  तुझे फोटो खूप गोड आहेत.

  उत्तर द्याहटवा
 8. छोटेमिया, आपने तो सही में धमाल की और धुम मचाई... मस्तच. मग कॅडबरी एकट्यानेच खाल्लीस की आईला पण दिलीस? बुट्टू हरवला...:( जाऊ दे, आपण दुसरा आणू हं का... तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन! आर्यन, मी खूप खूप मिस केले तुम्हां सगळ्यांना.

  उत्तर द्याहटवा
 9. आर्यन

  एका पिटुकल्या ब्लॉगरचे फोटो आम्ही खूप खूप ब्लॉगवर पाहीले बरं का..

  आणि कित्ती खाऊ मिळाला ना मेळाव्यात, सगळ्यांनी लाड केले असतील ना..

  मजा आहे एका मुलाची!

  उत्तर द्याहटवा
 10. >>स्टेजवर असतानाच महेंद्राकाकांनी सगळ्यात ’लहान’ ब्लॉगर म्हणून मला एक ’मोठी’ कॅडबरी दिली. मला महेंद्रकाका खूप आवडतात.

  हा हा.. साहियेस तू एकदम :) पण जास्त खाऊ नकोस कॅडबरी. त्याने दात किडतात. पुढच्या वेळी तुला कोणी कॅडबरी दिली की तू ती तुझ्या हेरंबदादाला देत जा. तुझा मित्र आदितेय पण असंच करतो ;-)

  आणि पुढच्या वेळी तुझं भाषण ऐकायला मी नक्की येणार आहे :)

  उत्तर द्याहटवा
 11. मीनलताई,
  आता तू ठाण्याला ये, मला मिळालेली कॅडबरी आपण मिळून खाऊ.

  उत्तर द्याहटवा
 12. श्रीताई,
  आम्ही सगळ्यांनी धमाल केली आणि तुम्हाला खूप मिस केले. कॅडबरी आईला पण दिली आणि बाबांना पण दिली.
  माझे खूप आवडते बुट्टु आहेत ते जे आता कधिच नाही मिळणार.

  उत्तर द्याहटवा
 13. विवेकदादा,
  पिटुकल्या ब्लॉगरतर्फे धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत!
  लाड तर खुप झाले माझे. भरपुर मजा केली

  उत्तर द्याहटवा
 14. हेरंबदादा,
  कॅडबरी जास्त कशी खाणार? आई देइल तेव्हा मी खाणार.
  पुढच्यावेळी तुला देइन पण एका अटीवर निम्मी मला देशिल तर :)
  पुढच्या वेळी आरूष, आदितेय आणि मी तिघे मिळून भाषण करु. मस्त मज्जा येइल.

  उत्तर द्याहटवा
 15. सिद्धार्थदादा,
  हो! मी खूप मजा केली. भरपुर खाऊ खल्ला
  फोटोबद्दल धन्यवाद आणि ब्लॉगवर नेहेमी येत जा.

  उत्तर द्याहटवा
 16. आर्यन,

  सर्व प्रथम सगळ्यात 'लहान' ब्लॉगरच अभिनंदन. काल तु खुप छान दिसत होतास. मी मागे बसून बर्‍याच वेळा तुला बघत होतो. खुप गोड आहेस तु. तु जेव्हा माझ्या समोरु जात होतास तेव्हा मी तुझे डोळे बघितले आणि त्यांच्या कडे बघत राहीलो. खुपच सुंदर आहेत तुझे डोळे.
  पुढच्या वेळेस नक्की तुझाशी बोलायला येईन.


  विशाल दादा
  (vishalgadkari.com / ragdapatties.com)

  उत्तर द्याहटवा
 17. अरे वा आर्यन बाळाने(चुकले ब्लॉगर आर्यन रावांनी) भरपुरच धमाल केलीत ना.... तुझे फोटॊ तर मस्त मस्त आलेत.... कॅडबरी खाल्लीस , मजा आहे रे!!!

  पुढच्यावेळेस खरचं बोल तु स्टेजवर!!!

  उत्तर द्याहटवा
 18. विशालदादा,
  माझ्या विश्वात तुझं खूप खूप स्वागत!
  अरे तु ठाण्याला ये ना आमच्या घरी माझ्याशी खेळायला, पुढच्या वर्षीपर्यंत कशाला वाट बघायची.

  उत्तर द्याहटवा
 19. तन्वीमावशी,
  मला आर्यनबाळच म्हण.
  कॅडबरी रोज थोडी थोडी खातोय.
  पुढच्या वर्षी पर्यंत मला चांगलं बोलता यायला लागेल.

  उत्तर द्याहटवा
 20. आर्यन, मज्जा आली रे तिथे...
  खुपंच गोड दिसत होता तू...
  सिंड्रेला येतेय तुझा बूट घेऊन...

  उत्तर द्याहटवा
 21. आर्यन,
  मी ही ठाण्याला राहतो. आता तर नक्की येइन तुझाशी खेळायला. तु ही ये माझाकडे,माझाकडे भू भू आहे.

  विशाल दादा
  (vishalgadkari.com / ragdapatties.com)

  उत्तर द्याहटवा
 22. Hiiee... Pilluu.... Kasa aahes..? Kasla godd disat hotas re tu...!!! :) Are tu tithe yenaar aahes he maahit asun suddha me Chocky nahi re aanu shakale tuzya sathi..( Tyache kaay aahe na me khoop aalashi aahe ..bharbhar aawaratach nai..tyamule khoop ghai ghait tayar houn aale hote me...) so, tuze chocky majhya A/c madhye due barr ka..
  Aani ho sorry re me photo kadhun kadhun irritate nai na kele tula...?? Pan tu disatch itka godd hotas ki mala rahavalech nai...
  Aani me blogger kakanchi mulgi vaigare ka vatale te vichar han aai la..???
  Aani ajun ek ( shevatache ) bhetuyaat aapan adhun madhun...!!! Yet jaa majhyashi khelayala... Nahitar mich yeun tapken tujhya ghari kadhitari... ;)
  [ aawarate ghyayala have nahitar tu mhanashil ki hi taai ektar photo kadhun kadhun pakawate nahitar bolun bolun tari...]
  Bayyee bayee...take care....!!!! Muahhaa.. :)

  उत्तर द्याहटवा
 23. आनंददादा,
  तू एव्हढ्या लांबुन आलास हे पाहून आईला खुप आश्चर्य आणि आनंद पण वाटला.
  माझा खुप आवडता बुट्टु होता :(

  उत्तर द्याहटवा
 24. विशालदादा,
  अरे वा! तू पण ठाण्याला रहातोस, सही! तुझ्याकडे भू भू आहे, मग तर काय मज्जाच मजा मला आणि बाबांना भू भू खूप आवडतो पण आई आणून देत नाही घरी.

  उत्तर द्याहटवा
 25. मैथिलीताई,
  मला पण खूप आवडलीस तू. अगं बर झाल तू काही आणलं नाहीस माझे दात किडतील ना एव्हढा खाउ खाउन!
  फोटो काढ कितीपण मला सवय आहे, घरी आई माझे सारखे फोटो काढते.
  तू पण ठाण्याची आहेस ना? मग आपण कधिही भेटु शकतो.

  उत्तर द्याहटवा
 26. आर्यन... २ दिवस झाले... शमिकाताई तुझी आठवण काढते आहे... :) आता भेटायला कधी येणार आहेस तू???

  उत्तर द्याहटवा
 27. गोड युवराज..तु तर ’सेंटर ऑफ़ अट्रॅक्शन ’ होतास मेळाव्यात...पुढच्या वेळी कॅडबरी मिळाली तर माझ्याबरोबर शेअर कर मी सुदधा तुझ्यासारखाच लहान आहे रे.......

  उत्तर द्याहटवा
 28. रोहनदादा,
  शमिकाताईला सांग मला पण तिची आणि तिच्या टचस्क्रिन फोनची आठवण येते. सध्या मी मावशीच्या लग्नात बि़झि आहे, ते शनिवारी झालँ की मी मोकळा, नँतर तुम्ही दोघही या आमच्या घरी. आई तुला फोन करेल, हां!

  उत्तर द्याहटवा
 29. देवेंद्रदादा,
  मी लहान आहे ना, म्हणून सगळे माझे लाड करत होते.
  पुढच्या वेळी तुला पण कॅडबरी देइन, बर का!

  उत्तर द्याहटवा
 30. ए पिल्लू तू कित्ती कित्ती गोडुला आहेस अरे...!!! मी आज च आलीये तुझ्या ब्लॉगवर... आणि सगळा वाचून काढला... आईला सांग आयडियाची कल्पना लई भार्री आहे म्हणून... :) लौकर मोठ्ठा हो राजा..... तुला खूप सारे पापे.... Muuaahh.... Muaahh... :)

  उत्तर द्याहटवा
 31. स्वातीताई,
  धन्यवाद! माझ्या विश्वात तुझे खुप खुप स्वागत.
  तुला पण माझ्याकडून एक गोडगोड पापा.

  उत्तर द्याहटवा
 32. अरे माझा आईला पण भू भू नाही आवडायचा. पण आता आई तीचे खुप लाड करते. भू भू घरात असेलना तर खुप मजा असते. माझा कडे मासे सुध्दा आहेत.

  उत्तर द्याहटवा
 33. खरच? मी मोठा झालो ना की मीच आणेन भू भू घरी. मला मासे पण खूप आवडतात, माझ्या ब्लॉगच्या टेम्प्लेटवर बघितलेस का, तिन मासे आहेत.
  तुझा पता किंवा फोन नं. देवून ठेव मला माझ्या इमेल आयडी वर
  aaryan.kelkar@gmail.com

  उत्तर द्याहटवा
 34. आर्यन अरे ती खेळायची माती आहे..वापरुन बघ मजा येईल...तुला भेटल्यामुळे आम्हाला पण मज्जा आली....

  उत्तर द्याहटवा
 35. अगं अपर्णाताई, मला आईने दिली होती खेळायला पण मी ती तोंडात घालतो म्हणून परत आत ठेवली.

  उत्तर द्याहटवा
 36. पुढच्या वेळेस आपण भेटलो की खूप गप्पा मारायच्या बरं का? आणि तू कधी गेलास? मला कळलंच नाही. मी आपली तुला शोधत होते. तुझी आई म्हणाली की तुला कंटाळा आला होता. अजून या सगळ्याची सवय नाही ना तुला? तुझे फोटो किती छान आलेत, पाहिलंस का? माझी थोडी कामं वाढलीत आता, त्यामुळे ही पोस्ट वाचायला उशीर झाला. पण तू मेळाव्याला आलास ना, मला खूप आनंद झाला. आपण पुन्हा नक्की नक्की भेटायचं बरं का?

  उत्तर द्याहटवा
 37. कांचनताई,
  मला पण तुला बाय करायच होतं जाताना पण तू सर्वात पुढे बसली होतीस म्हणून मग महेंद्रकाकांना सांगून बाहेर पडलो. फोटो खूप छान काढलेत गिरीश दादाने. आता तू ठाण्याला आलीस ना की आईला फोन कर मग मी येइन तुला भेटायला.

  उत्तर द्याहटवा
 38. kupach goad aahes h tu Aryan... tuzya sarkhach tuze vichr aahet ho, tu mazya gammatkodi ya nlogvar javun bhag tula avdel...mala kalav h...
  tula aashirwad
  tuzi
  jyoti mavshi

  उत्तर द्याहटवा