समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

मंगळवार, ऑक्टोबर ०५, २०१०

घोलवड - सावे फार्म

आत्या - काका, आई - बाबा आणि सायलीताई - मी असे सगळे मिळून एका छोट्याश्या ट्रिपला जायचं ठरलं. आत्याच्या नविन गाडीतुन.
बरीच शोधाशोध केल्यावर घोलवडला सावे फार्मला जायचं नक्की झालं.
जायच्या दिवशी सकाळी सगळ्यांबरोबर लवकर उठून बसलो, आईने पटापट मला तयार केलं. बाबांना ड्रायव्हिंगची प्रचंड आवड आहे. सकाळी लवकर निघालो की ट्राफिक पण कमी लागते म्हणून बाबांनी आम्हाला बरोबर सात वाजायच्या आत घराबाहेर काढले.आम्ही घोडबंदर रोड, मुंबई - अहमदाबाद रोड असे करत घोलवडला पोचलो.सावे फार्ममध्ये शिरल्याबरोबर मी इकडे तिकडे धावायला सुरुवात केली. आमच्या खोल्यांच्या आजुबाजुला मोठी मोठी झाडे होती आंबे, नारळ, जांब, स्टारफ्रुट,इ. आईने एका लांब काठीने जांब पाडले. मस्त होते चवीला. मोकळ्या पॅसेजमध्ये छान झोपाळा होता, सी सॉ होते, हॅमॉक पण होते.
आजुबाजुला ससे, कासव, माऊ, भू भू, माकडं असे प्राणी होते.
मस्त मजा येत होती. खोल्या पण छान होत्या. त्यांच्या भिंतींना बाहेरुन वारली पेंटिंग केले होते.

















दुपारी झोपुन उठल्यावर आम्ही जवळच्या बोर्डीच्या समुद्रावर गेलो फिरायला. चक्क यावेळी मी समुद्राला अजिबात घाबरलो नाही. मी एकटक त्याच्याकडे पहात होतो. मऊ मऊ वाळूत खेळायला पण खूप मज्जा आली. मी बिस्कीट खात असताना एक भू भू माझ्यामागे लागला. शेवटी त्याला पण बिस्कीट दिले तेव्हा गेला तिथुन.
रात्री गरम गरम पोळ्या, कोशिंबीर, दोन दोन भाज्या, चिकूचे लोणचे, पापड, आमटी भात, गुलाबजामुन असे जेवून सगळी गप्पा मारत बसली बराच वेळ. मी आपला झोपुन गेलो कारण दुसर्‍या दिवशी सावेंचे मोठे फार्म (३५ एकर्स) बघायला जायचे होते ना!
दुसर्‍या दिवशी सकाळी दुदु पिवून मी तयार पण झालो सगळ्याच्या आधी. मग काका आणि मी अंगणात पकडा पकडी खेळलो.
तिथे एक वेगळीच गाडी दिसली जिच्या सिट्स बांबूच्या पट्ट्यांच्या होत्या आणि छोटेसे इंजिन होते गाडी चालवायला. त्या गाडीला ’तारपा’ असे नाव होते. तारप्यामधे बसून आम्ही फार्मच्या बरेच आंत फिरलो.
शेकडो चिकूची, लिचीची झाडे, आंब्याची कलमे, अ‍ॅव्होकॅडो, युरोप फिग, दालचिनी/ तमालपत्र, वेलची, कॉफी अशी झाडे, विविध औषधी वनस्पती, कॅकटस गार्डन, फुलझाडे तसेच एक छोटेसे कृषीप्रदर्शन अशा अनेक गोष्टी बघितल्या. फार्मच्या मधोमध एक प्रचंड तलाव बांधला आहे. त्यात पावसाचे पाणी साठवून ठेवले जाते, उन्हाळ्यात पाणी टंचाई नको म्हणून.
ऊन खूप लागत होते पण मला डोक्यावर टोपी रुमाल वगैरे अजिबात आवडत नाही म्हणून मी टोपी घालत नव्हतो पण आईने सांगितले की जर मी टोपी घातली नाही तर वाघ येईल आणि मला घेवून जाईल, त्यामुळे नाईलाजाने घालावी लागली.
तिथुन आम्हाला अ‍ॅडव्हेंचर कॅंपच्या ठिकाणी नेले. मी एकदम वेगळ्याच गोष्टी पाहील्या तिथे. रोप क्लायबिंग, टायरमधला झोपाळा, मचाण, दोरीची शिडी अशा विविध अ‍ॅक्टीव्हिटीज होत्या तिथे.

तिकडे फिरून येइ पर्यंत ११ वाजले आणि गरम पण खूप होत होते. त्यामुळे सगळी स्मिमिंग पूल कडे वळली.
मी पाण्याला प्रचंड घाबरायचो त्यामुळे मी स्वतः पण पाण्यात जात नव्हतो आणि आई बाबांना पण जाऊन देत नव्हतो. तर सरळ बाबा वरती आले आणि त्यांनी मला उचलुन घेवुन सरळ पाण्यात नेवून बुडवले. थोडा वेळ रडलो पण मग मज्जा आली मला.

दुपारचे एक वाजेपर्यंत पाण्यात मनसोक्त डुंबल्यावर सगळी जण बाहेर आली. टेस्टी गरम गरम जेवण जेवून, थोडीशी झोप काढली आम्ही. तिथून चहा घेवून जे निघालो ते डायरेक्ट ठाण्याला येवून थांबलो. येतानाच पुन्हा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये परत जायचा प्लान केला आहे.

२९ टिप्पण्या:

  1. मज्जा आहे एका मुलाची...

    तुझा समुदावरचा अन टोपी घातलेला दोन्ही फ़ोटो आवडले..गोडु दिसतो आहेस. :) :)

    उत्तर द्याहटवा
  2. योगेशदादा,
    खूप मस्त आहे सावे फार्म.
    फोटोंसाठी बाबांना थॅंक्यु :)

    उत्तर द्याहटवा
  3. अरेच्या एकजण धमाल करून आलेय तर.... आर्यन यावेळेस तुझी आणि माझीही पोस्ट वारली पेंटिंग्स असलेली... सेम पिंच!! :)

    खाऊ तर जाम सही खाल्लास .... फोटो पण मस्तच एकदम!!!

    उत्तर द्याहटवा
  4. अरे हो! सेम पिंच तन्वीमावशी.
    आम्ही मे महिन्यात गेलो होतो सावे फार्मला.
    तसे पण मागच्याच आठवड्यात फिरून आलोय सज्जनगडला. तिथले फोटो पण टाकेन पुढच्या वेळी.

    उत्तर द्याहटवा
  5. मस्त मज्जा केली रे तुम्ही सगळ्यांनी.
    फोटो खूप गोड आले आहेत तुझे.

    उत्तर द्याहटवा
  6. मस्त सफ़ारी झाली रे तुझी...मजा आहे बुवा....खालुन तिसरा फ़ोटो खुप आवडला.खुपच गोड दिसतोयस..

    उत्तर द्याहटवा
  7. देवेंद्रदादा,
    खूप मजा केली मी तिकडे.
    आईला पण तो फोटो खूप आवडतो.

    उत्तर द्याहटवा
  8. सिद्धार्थदादा,
    छान आहे ही जागा. तू पण जा सुट्टीत.
    फोटोंबद्दल थॅंक्यु!

    उत्तर द्याहटवा
  9. अले वा, शॉलिड धम्माल केलीय बाळा तू..मज्जा कर.
    बाकी फोटू झ्याक हाएती...

    उत्तर द्याहटवा
  10. आर्यन बाला..भारीच मज्जा केली की तुम्ही.आमी पण बोर्डीच्या Collage मध्ये शिकायला होतो..तेव्हाचे दिवस आठवले बघ.घोलवड स्टेशन ते गोदरेज collage आम्ही पायगाडीनेच जायचो.लेक्चर्स संपली की समोरच्या समुद्र किनारयावर अफाट धिंगाणा घालायचो.डहाणू ते बोर्डी (चिखला मार्गे) हा रस्ता तर अगदी अप्रतिमच....!

    उत्तर द्याहटवा
  11. अरे आर्यन बर्‍याच दिवसांनी दिसला.. (आणि मी सुद्दा)...
    खुप मज्जा केलेली दिसतेय... मस्तंय

    उत्तर द्याहटवा
  12. अरे वा आर्यन.. भारीच मज्जा करून आलास की रे.. तुझा टोपीतला फोटू कसला आलाय यार.. मस्तच..

    आणि हे काय रे? एवढ्या मोठ्या समुद्राला घाबरला नाहीस आणि स्वीमिंगपुल मध्ये घाबरलास? हेहे..

    उत्तर द्याहटवा
  13. अरे तुझी आई कुठे?? आम्हाला भेटणार होती ना ती... असो मस्त भटकून अलास की. घोलवड -बोर्डी म्हणजे माझे गाव बरे का... :) मस्तच आहे सर्व तिकडे. कधी जमले की अता चौधरी बाग़ आणि जंगल कम्प ला पण जाउन ये... :)

    उत्तर द्याहटवा
  14. मस्त मस्त मस्त...
    टोपितला फोटो एकदम मस्त ..

    उत्तर द्याहटवा
  15. अरे वा .. फोटोमधला ससूला कोण आणि तू कोण हे समजलंच नाही बॉ.. मजा करून आलास ना?? पुढल्यावेळेस आम्हाला पण ने रे..

    उत्तर द्याहटवा
  16. घोलवड -बोर्डी म्हणजे माझ्या पण गावाच्या बाजूला...."तारपा" नावाचा एक आदिवासी नाच असतो बर का आर्यन..त्यांची पेंटिंग पाहिलीस न पुढच्या वेळी कधी नाच पण पाहता आला तर बघ..
    यावेळी खाऊची तर धम्माल आलेली दिसते....
    आणि आमच्यासाठी बोर्डीचे चिकू आणलेस का?? इथे अमेरिकेत चिकू अजिबात मिळत नाही म्हणून मला नेमकी फक्त त्याचीच आठवण आली बघ....

    उत्तर द्याहटवा
  17. अपर्णामावशी,
    अरे वा! घोलवड - बोर्डी सगळ्यांचेच आवडते दिसते आहे.
    ’तारपा’ नाच पुढच्या वेळी नक्की पाहीन. तिकडे तुला चिकू मिळत नाहीत? आईला, DHL ने पाठवायला सांगू का?

    उत्तर द्याहटवा
  18. सुहासदादा,
    मी खूप धमाल केली तिकडे, तुम्ही कशी ट्रेकला गेल्यावर मज्जा मज्जा करता तशीच.
    फोटोग्राफी बाय माय बाबा.

    उत्तर द्याहटवा
  19. सचिनदादा,
    तू बोर्डीला शिकायला होतास, सही रे! मग तर तू रोजच धमाल करत असणार.
    मी पण दोन दिवस खूप मजा केली. होय आम्ही पण डहाणू ते बोर्डी (चिखला मार्गे) च गेलो, बाबा म्हणत होते हा छान रस्ता आहे.

    उत्तर द्याहटवा
  20. आनंददादा,
    मी बिझी होतो रे!
    तू कुठे गायब झाला होतास? घोलवडला खूप मज्जा केली.

    उत्तर द्याहटवा
  21. हेरंबदा,
    भारी म्हणजे एकदम भारी मज्जा करून आलोय मी. टोपीतला फोटो आईचा पण एकदम फेव्हरेट.
    समुद्र मोठा असला तरी माझ्यापासून बराच लांब होता रे, स्मिविंगपुल मध्ये नुसते पाणीच पाणी चोहीकडे. जाम वाट लागली माझी, माहीत्ये?

    उत्तर द्याहटवा
  22. रोहनदादा,
    आई कुठे जाणार आहे इकडेच. काहीना काही चालू आहे रे तीचे त्यामुळे नसेल भेटली. तू पण बोर्डी साईडचाच, छान आहे तो सगळा भाग. आता पुढच्या वेळी चौधरी बाग़ आणि जंगल कम्पला.

    उत्तर द्याहटवा
  23. सागरदादा,
    थॅंक्यु थॅंक्यु थॅंक्यु!
    टोपीतला फोटो आईचा पण एकदम फेव्हरेट

    उत्तर द्याहटवा
  24. महेंद्रकाका,
    तिकडे आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली. चालेल पुढच्या वेळी तुम्हाला पण बरोबर घेवून जाईन.

    "फोटोमधला ससूला कोण आणि तू कोण हे समजलंच नाही बॉ" - असं काय म्हणता, ससूला बघितलात का नंगू आहे, मी कसे छान छान अंगे घातलेत :)
    तुम्हाला माहीत्ये, आई पण कधि कधि मला "माझा ससूला, माझा ससूला" म्हणत असते.

    उत्तर द्याहटवा
  25. हा ब्लॉग खुपखुपखुप अप्रतिम आहे. मला आजच रोहनने लिंक दिली. आत्तापर्यंत वाचलेल्या ब्लॉगपैकी सर्वात उत्कृष्ट. पहिला नंबर.... :) मी सगळे पोस्ट वाचुन काढले... एक सो एक... very unique way of keeping the memories... simply loved it. many many warm & heartiest complements... god bless you!!! god bless you!!! :) :) :) व्वाह व्वाह व्वाह this blog made my day today... :D टेम्प्लेटपण सुरेख आहे. :) निर्मळ निरागस ब्लॉग :) आवडला... प्रचंड आवडला... :)

    उत्तर द्याहटवा
  26. सौरभ,
    धन्यवाद! आर्यनच्या विश्वात खूप खूप स्वागत!
    ब्लॉग वाचून तुमच्या दीवसाची सुरुवात छान झाली आणि तुमची कमेंट वाचून माझ्या दीवसाची सुरुवात छान झाली.तुम्हाला ब्लॉग, टेम्प्लेट सगळे आवडले हे वाचून आनंद वाटला.
    आर्यनची आई (सोनाली)

    सौरभदादा,
    माझ्या विश्वाला नेहेमी भेट देत रहा.
    आर्यन

    उत्तर द्याहटवा
  27. AAe gayab kuthe ahes ???

    Gayab aayaa, Gayab aayaa, Gayab aayaa, Gayab aayaa, Gayab !

    Kissi ko hasane aaya, kissi ko satane aaya !

    Gayab aayaa, Gayab aayaa, Gayab aayaa, Gayab aayaa, Gayab !

    http://www.youtube.com/watch?v=pfQJyTldy6U

    उत्तर द्याहटवा
  28. मस्तच
    यंदा जेव्हा भारतवारी होईल. तेव्हा येथे जाण्याचा मनसुबा आहे.

    उत्तर द्याहटवा