समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

मंगळवार, सप्टेंबर ०७, २०१०

८ सप्टेंबर, मागच्या वर्षीचा

मला अचानक ८ सप्टेंबरची का आठवण झाली?
पटकन उत्तर हवं असेल तर फोटो पहा आणि सावकाश कळलं तरी चालणार असेल तर पोस्टच वाचा.
तर मागच्या ८ सप्टेंबरची सुरुवात अशी झाली. आंघोळ झाल्यावर आजीने आणलेला नविन ड्रेस घातला मग आईच्या मांडीवर बसलो. आजीने मला औक्षण केले, माझ लक्ष मात्र खाली ठेवलेल्या ढोकळा आणि जिलबीकडे होतं :)

छान छान खाऊ खावुन दुपारी मस्त झोपलो. झोपुन उठल्यावर बघतो तर काय अजुन एक नविन ड्रेस. मावशीने मला जीन्सची पॅंट आणली होती. माझी पहिली जीन्स. मग मी जीन्स पॅंट आणि टी शर्ट घालुन तयार झालो.


मला कळेचना की आमची सगळी गॅंग नक्की कुठे चालली आहे. एका ठिकाणी सगळे गाडीतुन उतरलो. आमच्या बरोबर भरपुर सामान होते. मोठ्या पिशव्या, बॉक्स, इ. तिथे आत गेल्यावर बघतो तर काय मस्त सजावट केलेली, फुगे लावलेले, आणि गंम्मत म्हणजे भिंतीवर सगळीकडे माझेच फोटो लावले होते.
हळु हळु एक एक दादा, काका, मावशी, माझे मित्र मैत्रिणी सगळे जमले तिथे. प्रत्येक जण यायचा मला शेकहॅंड करायचा आणि काहीतरी रंगीबेरंगी बॉक्स माझ्या हातात द्यायचे. मग आई किंवा मावशी माझ्या हातातुन काढून घ्यायचे, मी जोरात ओरडायचो, मला हवा असायचा तो बॉक्स माझ्या हातात.
तिथे भरपुर जणं जमल्यावर मला बाबांनी उचलुन घेतले. आई, बाबा आणि मी स्टेजवर गेलो. तिथे दोन दोन केक होते. सगळ्यांनी एका सुरात गाणे म्हटले, 'HAPPY BIRTHDAY TO YOU, AARYAN'
आई बाबांनी माझा हात धरुन केक कापला. कुणी मला भरवला तर कुणी मला असा रंगवला.

माझ्या मित्र मैत्रिणी आणि ताई दादांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या.

मग छोट्या मानसीताईने जादूचे प्रयोग करुन दाखवले.

ते बघता बघता मला आणि माझ्या मित्राला झोपच आली. बरं झालं आईने माझं अंथरुण पांघरूण आणलं होतं बरोबर. मित्राला पण अचानक झोप आल्यामुळे एकाच अंथरूणावर कसे बसे झोपलो आम्ही दोघं. आई म्हणाली, पुढच्या वेळी लक्षात ठेवायला हवं, वाढदिवसासाठी बोलवलेल्या गेस्टसाठी पण अंथरुण पांघरूण आणायला हवं.

मला जेव्हा जाग आली तेव्हा मी काय पाहीलं माहीत्ये? आई बाबा मस्तपैकी श्रीखंड पुरी, कॉर्न टिक्की, छोले, पनीर मसाला, पुलाव, केक असे छान छान खाऊ खात होते. मी उठलो आणि डायरेक्ट आईच्या पुढ्यातच जावून बसलो. माय फेव्हरेट श्रीखंड पुरी खायला.

असा हा मागच्या वर्षीचा ८ सप्टेंबर उद्या परत येणार आहे.

३७ टिप्पण्या:

 1. Happy Birthday in Advance !!

  aaj chi tuzi post baghun "GAYAB AAYA" asa mhanavasa vattay !!

  उत्तर द्याहटवा
 2. आर्यन, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या एक माणूस पुन्हा केक कापणार. पुन्हा भरपूर भेटवस्तू आणि खूप सारा खाऊ मिळणार. मज्जा कर...!!!

  उत्तर द्याहटवा
 3. ही पोस्ट एवढी भारी झाली आहे आर्यन, की तुझे वय वर्ष २५ झाल्यावर जर तु ही वाचलीस ना तर तु खुप एंजॉय करशील...

  उत्तर द्याहटवा
 4. अरे वा आर्यन... वादिहाहाशु !! मस्त मज्जा कर खूप.. आणि या ८ सप्टेंबरची पार्टी कशी झाली ते नक्की कळव आणि भरपूर फोटोही टाक.

  उत्तर द्याहटवा
 5. अले वा बडे बॉय ,
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  आणि माझ्या वाटणीचा केक पण तूच खा बर ..... :)

  उत्तर द्याहटवा
 6. आर्यन वाढ्दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा...अन पार्टीचे फ़ोटो टाक बर का...

  उत्तर द्याहटवा
 7. आर्यन, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.....

  आरुष आणि अपर्णा मावशी

  उत्तर द्याहटवा
 8. आर्यन बाळा वादिहाहाशु !! खूप मोठा हो, खूप यशस्वी होवोस..
  धम्माल कर...

  उत्तर द्याहटवा
 9. अरे वाह आर्यन
  तुला वा दि हा हा शु ....
  आजचा वाढदिवस कसा झाल ते पण सांग

  उत्तर द्याहटवा
 10. अरे वा!!! आर्यनबाळाचा वाढ्दिवस मस्तच.... :)
  तूला मावशीकडुन, ईशानदादा आणि गौरीताईकडून खूप खूप शुभेच्छा!!!

  आणि तुझ्या आई-बाबांना मावशीकडून स्पेशल शुभेच्छा सांग... आपले बाळं मोठे होताना पहाताना आई-बाबांना जाम आनंद होत असतो...:)

  धमाल कर एकदम!!! आणि फोटो टाकायला विसरू नकोस!!

  उत्तर द्याहटवा
 11. युवराज.. आपणास वाढदिवसाचे मन:पूर्वक अभिनंदन... आज आपली भेट झाली तर अजून उत्तम .. :)

  उत्तर द्याहटवा
 12. विक्रमदादा,
  थॅंक्स!
  पण "GAYAB AAYA" म्हणजे रे काय?

  उत्तर द्याहटवा
 13. सिद्धार्थदादा,
  धन्यवाद!
  आई कुठला केक आणते ते बघुया. मावशीने छान दप्तर आणलय मला, सशाचे चित्र असलेले.

  उत्तर द्याहटवा
 14. गौरवदादा,
  ब्लॉगवर स्वागत आणि आभार!
  हो! मी मोठा झाल्यावर मला खुप मज्जा वाटेल या गमती वाचताना.

  उत्तर द्याहटवा
 15. हेरंबदादा,
  खुप खुप थॅंक्यु!
  सकाळपासुन खुप मज्जा करतोय. प्लेगृपमध्ये कॅडबरी वाटली. संध्याकाळी माझ्या दोन्ही मावश्या पण येणार आहेत घरी. पार्टी गणपतिनंतर असेल तेव्हा फोटो काढेल आई.

  उत्तर द्याहटवा
 16. सचिनदादा,
  धन्यवाद!
  चालेल, तुझ्या वाटणीचा केक पण मीच खाईन रे!

  उत्तर द्याहटवा
 17. योगेशदादा,
  खुप खुप आभार रे!
  पार्टी गणपति नंतर.

  उत्तर द्याहटवा
 18. अपर्णामावशी आणि आरूष खुप खुप आभार!

  उत्तर द्याहटवा
 19. सागरदादा,
  आभार!
  आजचा वाढदिवस घरगुती आणि साधेपणाने साजरा करणार आहे आई. पार्टी गणपतिनंतर.

  उत्तर द्याहटवा
 20. तन्वीमावशी,
  तुझा असाच आशीर्वाद असावा.
  गौरीताई आणि ईशानदादाला थॅंक्स सांग.
  आर्यन

  धन्यवाद तन्वीताई.
  खरच, बाळ मोठं होतय, पटापट वर्ष चालली आहेत. हे दिवस कायम रहावेत असेच वाटते.
  फोटो काढले की अपलोड करेन नक्की.

  उत्तर द्याहटवा
 21. रोहनदादा,
  थॅंक्यु रे!
  ये ना घरी संध्याकाळी.

  उत्तर द्याहटवा
 22. मुग्धामावशी,
  खुप खुप धन्यवाद आणि तुझे स्वागत आर्यनच्या विश्वात.

  उत्तर द्याहटवा
 23. GAAYAB navahi ek cartoon seria lagaychi DD var - jab sirf DD huva karta tha !! tyach title song "GAYAB aaYA" khup mast hota te !!! - tu gayab hotas na blog varun khup divas shifting and all madhe - ata aalas mhanun bara watala !! So "GAYAB aaya" :)

  Youtube var kuthe sapadali tar link pathvin GAYAB chi

  उत्तर द्याहटवा
 24. आर्यन वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.... खूप उशीर झाला....

  उत्तर द्याहटवा
 25. कान पकडले आहेत... उशीर झाल्यामुळे... बिलेटेड हॅप्पी बर्थडे.. मजा वर्षभर करायची असते म्हणून थोड्या उशीराने शुभेच्छा चालतात ;)

  उत्तर द्याहटवा
 26. आनंददादा,
  चालेल रे!
  खुप खुप धन्यवाद!

  उत्तर द्याहटवा