समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

गुरुवार, ऑगस्ट २६, २०१०

काय करु आणि काय नको????



मला माहित्ये खूssssssssssप दीवसांत मी ब्लॉगवर फिरकलोच नाहीये दुसर्‍यांच्या आणि स्वतःच्या पण.
आईबाबानी मोठे घर घेतले, मला खेळायला, अभ्यास करायला, वगैरे वगैरे. मग जुन्या घरातील सामानाचे नविन घरात शिफ़्टींग, नविन घरात आईच्या दृष्टीने हा पसारा, माझ्या मते खूप वेगवेगळी खेळणी.
रोज मला नविन खेळणे मिळते आहे कुकरपासून सोफ्याच्या कुशनपर्यंत.


आता आईने सगळे आवरायला घेवुन मला मदतीला घेतले आहे त्यामुळे मला अगदी काय करु आणि काय नको असे होते आहे.
आता एकदा सगळं सामान व्यवस्थित लावुन झालं की आलोच मी परत.

२८ टिप्पण्या:

  1. नवीन घराबद्दल अभिनन्दन. पुढच्या वेळेस नवीन घराचे ाणि तुझ्या खेळण्यांचे भरपूर फोटो अपलोड कर...

    उत्तर द्याहटवा
  2. लीनाताई,
    धन्यवाद आणी माझ्या विश्वात तुझे खुप खुप स्वागत.
    नक्की करीन सगळे फोटो अपलोड.

    उत्तर द्याहटवा
  3. नवीन घराबद्दल अभिनंदन....अन हो लवकर ये आम्ही सर्वजण तुला खुप मिस करतोय...

    उत्तर द्याहटवा
  4. धन्यवाद मनमौजीदादा!
    लवकरच येतो परत.

    उत्तर द्याहटवा
  5. नवीन मोठ्ठ घर,नवीन मित्र.... मज्जा आहे रे तुझी

    लवकर ये आम्हीं वाट पाहतोय बर....... :)

    उत्तर द्याहटवा
  6. वा नविन घर..मजा आहे बुवा एका मुलाची..
    ये रे लवकर..

    उत्तर द्याहटवा
  7. अरे कितीदिवसा नंतर आलास? आता लवकर टाक पोस्ट.

    उत्तर द्याहटवा
  8. खूप दिवसानंतर आलास आर्यन,

    मोठं घर कसं आहे?
    कोणते कोणते खेळ आहे ते नवीन पोस्ट मध्ये टाक.
    खेळायला येतो.

    अभिनंदन.

    नागेश.
    http://blogmajha.blogspot.com

    उत्तर द्याहटवा
  9. आर्यनबाळा, कधीपासून तुझी वाट बघत होतो रे.. आता मस्त नवीन पोस्ट एक आणि तुझ्या नवीन घराच्या गंमतीजमती कळव.. नवीन घराबद्दल अभिनंदन !! :)

    उत्तर द्याहटवा
  10. लवकर लवकर ये रे बाळा परत..वाट बघतोय :)

    उत्तर द्याहटवा
  11. अरे बाळा... तुझी आई तुझ्यामागे धावून-पळून जशी थकते ना.. तसे आम्ही सर्वजण तुझी वाट बघून थकलो... :) आता भरभर लिही पाहू. आणि हो मी येतोय तुला भेटायला तुझ्या नवीन घरी... :)

    उत्तर द्याहटवा
  12. सचिनदादा, बरोब्बर बोललास तू. आमच्या नविन घरा समोरच्या घरातच माझा नवा मित्र रहातो, प्रथमेश नावाचा.

    उत्तर द्याहटवा
  13. देवेनदादा,
    नविन घर मस्त आहे. जुन्या घरापेक्षा मोठं पण आहे, त्यामुळे मला एकटे एका खोलीतुन दुस‍र्‍या खोलीत जायला पण भिती वाटते.
    येतो लवकरच.

    उत्तर द्याहटवा
  14. महेंद्रकाका,
    घराच्या शिफ़्टींगमध्ये बिझी होतो ना!
    आता आलोय ना परत, लिहीतो आता नविन गमती जमती पटापट.

    उत्तर द्याहटवा
  15. नागेशदादा,
    माझ्या ब्लॉगविश्वात खूप खूप स्वागत.
    मोठ घर खूप मोठं आहे. सध्या तर सगळी वेगवेगळी खेळणी मिळतात मला. माझी खेळणी अजुन बॉक्समधुन बाहेर काढली नाहीयेत ना म्हणून :)

    उत्तर द्याहटवा
  16. थॅंक्यु हेरंबदा!
    मला पण तुमची सगळ्यांची खुप आठवण यायची पण काय करणार जाम बिझी होतो रे!
    कळवतो ना नविन घरातल्या गमती जमती.

    उत्तर द्याहटवा
  17. सुहासदादा,
    आलोच, दोन दिवस दे मला फक्त.

    उत्तर द्याहटवा
  18. रोहनदादा,
    तू तुझी टूर संपवून आलास की फोन कर आईला ती तुला नविन घराचा पत्ता देइल मग तू शमिकाताईला घेवून ये नविन घरी.

    उत्तर द्याहटवा
  19. नवीन घराबद्दल अभिनन्दन...:) आता एक नवीन पोस्ट आणि तुझ्या नवीन घराच्या गंमतीजमती कळव...

    उत्तर द्याहटवा
  20. Hiii...आर्यन...!!! कसा आहेस..? कित्ती वाट बघितली तुझी मी...!!! तुला मेल पण पाठवला होता...असो, आत्ता ये लवकर पुन्हा....वाट बघतोय आम्ही... :)

    उत्तर द्याहटवा
  21. आपर्णाताई,
    धन्यवाद! नविन घरतल्या गमती लवकरच लिहीन.

    उत्तर द्याहटवा
  22. मैथिलीताई,
    अगं मी तुझे मेल खूप उशिरा पाहीले मग म्हटले आता काय रिप्लाय लिहायचा?
    पाण आता मी परत आलोय ना त्यामुळे भेटूच. हो! नविन घरी ये ना!

    उत्तर द्याहटवा
  23. are zala ka nahi shifting ... ये लवकर पुन्हा....वाट बघतोय आम्ही... :)

    उत्तर द्याहटवा
  24. आर्यन...कित्ती गोड आहेस तू! आणि तुझा ब्लॉगही फार छान आहे.
    आईला सांग तुझ्या फोटोंवर तीळ लावून पोस्ट करायला...

    उत्तर द्याहटवा
  25. सागरदादा,
    माझ्या विश्वात खुप खुप स्वागत.
    तीळ लावुन फोटो काढला तर कसातरी दिसेल ना रे!
    तशी माझी आजी रोज माझी दृष्ट काढते.

    उत्तर द्याहटवा