समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

शुक्रवार, मार्च ०५, २०१०

पहिली मम्मम्



आज आई सकाळपासून एव्हढी साफसफाई का बरं करत्ये? आजी पण सकाळीच आली, येताना भरपुर डबे आणि काय काय खाऊ घेवुन आली. आईने जयेशमामाला फोन केला आणि सांगितले, बरोब्बर दुपारी १२.३०वा. ये रे उशिर नको करु कारण तू आल्याशिवाय कार्यक्रम सुरु करता येणार नाही.

आता कळलं काहितरी कार्यक्रम आहे घरात. तरीच एव्हढी गडबड चालली आहे.

माझ्या दोन्ही मावशांचा अजुन पत्ता नव्हता आणि बाबा बाहेर गेले होते, त्यामुळे मला आईने किचनमध्येच एका दुपट्यावर ठेवले. आजुबाजुला बर्‍याच वस्तु असल्यामुळे मी लगेच उपडा वळलो, बाबांच्या भाषेत King Cobra Position मध्ये आलो. मी पाहिलं आई एका छान चकाकणार्‍या ताटात छान छान खाऊ वाढत होती. त्या ताटात तशाच चकाकणार्‍या दोन वाट्या आणि चमचा पण होता.मी हे सगळ बघत असतानाच आई म्हणाली, शनु, आज तुझी पहिली मम्मम् मोठ्या ताटात आमच्यासारखी. आजी म्हणाली, 'उष्टावण' म्हणायच त्याला. आज आजी कठीण भाषेत बोलत होती. मला खुप आनंद झाला पण मी जेवणार कसा?

तेव्हढ्यात जयेश मामा आला. त्याने मला एक कापडाचा बॉल दिला मी चावुन बघितला एकदम मऊ मऊ होता. थोड्या वेळाने रुपामावशी आणि शमुमावशी पण आल्या. बाबा आल्यावर सगळे हॉलमध्ये जमलो. माझं लक्ष माझ्या ताटाकडेच होतं.

आईने मला नेहेमीसारखं ओवाळलं मग आजीने मामाला सांगितले या सोन्याच्या अंगठीने आर्यनला खीर चाटवं. मी चाटुन पुसुन खल्ली अंगठीची खीर. छान होती.




मग बाबांनी लाडू दीला मला खायला, माझ्या तोंडात शिरलाच नाही, मी त्याला चाटुन बघितलं गोड गोड लागला मला.


आजीने पुरणपोळीचा छोटुसा घास भरवला तो मात्र मला मस्त खाता आला.


शमुमावशीने भरवलेलं श्रीखंड पण मला खूप आवडलं. आईने मला गोडाच्या शिर्‍याचा घास दीला. चमच्याने वाटीतली सगळी खीर पण भरवली. मी छोटासा वरणभात पण खल्ला. माझं पोट खूप भरलं. माझ्या ताटात कितीतरी पदार्थ होते श्रीखंड, पुरी, खीर, लाडू, शिरा, पुरणपोळी, वरणभात, लिंबू, दही, लोणचं, चटणी, कोशिंबीर, पापड, फेणी, पुलाव बापरे!


आता कळलं ही मोठी माणसं भरडी का खात नाहीत!

६ टिप्पण्या:

  1. झाल का रे तुझ पोटभर जेवण?अन आता यापुढे आईला जेवताना त्रास नाही द्यायचा....आईने दिलेलं सर्व पटपट खायचं....

    उत्तर द्याहटवा
  2. सागरदादा,
    याबाबतीत तरी आईला माझा काही त्रास होणार नाही याची खात्री आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. वाह..आर्यन. आईच असच एकायच..मश्त मश्त मम..मम करायाच. लवकर लवकर मोठ व्हायच ना? क्यूट दिसतो आहेस फोटोत नेहमीसारखाच. आईला थॅंक्स सांग

    उत्तर द्याहटवा
  4. थँक्स सुहासदादा!
    मी ऐकतो आईचं सगळं

    उत्तर द्याहटवा
  5. आर्यन
    अरे मी तुझ्या पोस्ट ची वाट पाहत आहे रे....

    उत्तर द्याहटवा
  6. अरे मी आईचा एवढा वेळ घेतो की बिचारीला लिहायला जमले नसेल :)
    थांब सांगतो तिला लिहायला.

    उत्तर द्याहटवा