समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

मंगळवार, मार्च ०२, २०१०

बाबांच ऑफिस

बाबा सांगत होते आईला, मी अ‍ॅडमिन् मधुन स्पेशल परवानगी घेतली आहे ऑफिसच्या फॅमिली व्हिजिटसाठी.
गोरेगावच्या काकाआजोबांकडे जाताना रस्त्यातच बाबांचे ऑफिस आहे. सकाळी साडेनऊ वाजता आम्ही तिथे पोचलो. एका निळे कपडे आणि निळी टोपी घातलेल्या माणसाने गाडी चेक केली आणि एका कागदावर बाबांची सही घेतली. त्याने एक लाल गळ्यातले दीले ज्याला एक छोटा चौकोन होता. ते आईने गळ्यात घातले. मग आम्ही गाडी खाली पार्क करुन ऑफिसमध्ये आलो. मोठे कारंजे होते तिथे. छान काचेच्या भिंती, छान छान पुस्तकं, चित्रे आणि मऊ मऊ खुर्च्या पण होत्या. बाबांनी मला एका खुर्चीत बसवले होते. बाबा मला म्हणाले, हे रिसेप्शन आहे.




















बराच वेळ मला कोणी उचलुन घ्यायचं ते ठरत नव्हतं, शेवटी बाबांनीच मला उचलुन घेतले.
तिथुन आम्ही डोम एरियात गेलो. मोठा काचेचा डोम होता आणि त्याच्या बाजुने पाणी सोडले होते. त्यात केवढे छान रंगित मासे पण होते. मी आणि बाबा त्याच्या कडेलाच बसलो होतो पण माझा हात पोचत नव्हता पाण्यापर्यंत.













तिकडे आजुबाजुला खेळायला केवढी जागा होती. मग आम्ही लॉनवर फिरलो, झाडसुद्धा बघितली. बाबांच्या ऑफिसच्या शेजारी मोठा मॉल पण आहे. आई म्हणाली, नंतर तिकडे जावुया कारण तिथे मॅकडॉनल्डस् आणि फूड बझार होते.



हे सगळ बघुन आम्ही बाबा जिथे बसतात तिथे जावुन आलो. बाबांची चाकांची खुर्ची मला खुप आवडली. आई म्हणाली, तिच्या ऑफिसमध्ये यापेक्षा छान Executive chairs आहेत त्यांना बसायला. आईचे ऑफिसपण बघायला जायला हवं.

एवढं छान आहे इथे बाग आहे, रंगित मासे आहेत, खेळायला भरपुर जागा आहे तरी पण बाबांना ऑफिसला जायचा कंटाळा कसा येतो काय माहीत?

९ टिप्पण्या:

  1. प्रगती आहे. फिरणं झालं, बाहेर जाउन गाण्यांचा कार्यक्रम पाहिला, आता ऑफिस पण बघितलं.. मजा सुरु आहे रोज.. :)

    उत्तर द्याहटवा
  2. आम्हाला दोघांनाही फिरायला प्रचंड आवडते. आर्यन व्हायच्या आधि आम्ही खूप फिरुन घेतले आहे, गेले वर्षभर हा लहान असल्यामुळे जास्त लांब कुठे जाता आले नाही. आता परत पायाला चाकं बाधली आहेत.

    उत्तर द्याहटवा
  3. अरे वा! हळूहळू आर्यनचे फिरणे वाढतेय. मस्तच. आर्यनचा शेवटचा प्रश्न बाकी पर्फेक्ट.... :)

    उत्तर द्याहटवा
  4. भाग्यश्रीताई,
    लहान मुलांना फिरायला प्रचंड आवडते ना! आर्यन रडत असला तर नुसत म्हणल ना, चला भुर्र जावुया, की लगेच रडायचा थांबतो. आणि हो, ऑफिस कितीही छान असलं तरी जायचा कंटाळाच येतो नाही का?

    उत्तर द्याहटवा
  5. हे टेम्प्लेट जास्त छान आहे.. :)

    उत्तर द्याहटवा
  6. सोनाली केळकरमार्च ०४, २०१० ५:४५ PM

    धन्यवाद महेन्द्रकाका!
    पण ते तिन मासे पाहीलेत का? दोन मोठ्या माशांची तोंड वेगवेगळ्या दिशेला आणि बिचारा लहान मासा confuse:) पण प्रत्यक्षात असे नाहीये हां!
    सलिलच्या ब्लॉगवर दीलेल्या माहितीच्या आधारे बदलली template,मला पण खुप आवडली.

    उत्तर द्याहटवा
  7. वाह बेटा मस्तच भ्रमंती चालू आहे..
    फोटोस मस्त..पोस्ट झकास..ऑफीस Oracle (Iflex) काय?
    माझ्या आईला हा ब्लॉग खूप आवडला :) तिला कंप्यूटर जास्त नाही ऑपरेट करता येत पण ह्या विश्वाला भेटायाची आस लागून असते कोणी कंप्यूटर लावला की:)
    खरच अप्रतिम आहे. आर्यनला सगळा मोठेपाणी वाचताना किती किती मज्जा येईल नाही..

    उत्तर द्याहटवा
  8. सुहास,
    होय ऑफिस Oracle चेच आहे, Hub mall शेजारी.
    तुमच्या आईला हा ब्लॉग आवडतो हे वाचुन खुप खुप आनंद झाला. आपण लिहीलेले लोक वाचत आहेत आणि त्यांना आवडते हे पाहून उत्साह द्विगुणित झाला. आर्यनला मज्जा नक्की वाटेल.

    उत्तर द्याहटवा