नंतर जेव्हा आजीने आईला विचारले या देवांची तोंडे या बाजूला कशी झाली? आईला पण समजेना असं कसं झाल? जेव्हा त्यांना समोरच्या करंज्या दिसल्या तेव्हा सगळ्याचा उलगडा झाला आणि मला परत हे काम न सांगण्याचा पण निर्णय घेण्यात आला. असो.
मग आई चकल्या पाडून देत होती आणि आजी तळून घेत होती, मी टेस्टिंगचे काम करत होतो. मध्येच तळलेल्या कुठल्या आणि कच्च्या कुठल्या ते मला समजायचे नाही. त्यामुळे माझ्या हातुन चुकुन काही चकल्या मोडल्या गेल्या आणि माझी रवानगी दुसर्या खोलीत झाली. पण रडून रडून मी पुन्हा त्यांना सामिल झालो.
मी दुपारी झोपलो तेव्हा त्यांनी चिवडा करून घेतला.
संध्याकाळी आमच्या सगळ्या खिडक्यांमधले आकाशकंदिल लावले. नविन LED ची ट्युब लावली. मस्त चकमक चकमक करत होती ती.
उद्यापासून तिन दिवस आई पण घरी आणि बाबा पण घरी त्यामुळे मज्जाच मज्जा येणार आहे. मी भरपूर खाऊ खाणार, फुलबाज्या आणि केपं वाजवणार, नविन नविन कपडे घालून फिरायला जाणार. खूप धमाल करणार.
मी तर दिवाळी साजरी करायला सुरुवात केली सुध्दा,

वा युवराज. मज्जा आहे तुमची. मज्जा करा मस्त यंदा..:)
उत्तर द्याहटवातुम्हाला आणि तुमच्या आई-बाबांना, कुटुंबियांना दिवाळीच्या खूप खूप आनंदमय शुभेच्छा ...
आर्यन बेटा, तुला आणि तुझ्या संपूर्ण परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्तर द्याहटवाआर्यनशेठ, दिवाळीच्या दिन दिन शुभेच्छा !!
उत्तर द्याहटवादेवांची तोंडं वळवलीत.. हा हा हा.. आपण महान आहात.. अशीच मज्जा करत रहा :)
a,
उत्तर द्याहटवादिवाळीच्या दिन दिन दिवाळीच्या शुभेच्छा... फटाक्यांना घाबरला नाही का ? अरे वा खूप शक्तीमान दिसतोस!
भले शाब्बास!!! तुला आणि तुझ्या कुटुंबियांना दिवाळीच्या गोडगोड शुभेच्छा!!! :)
उत्तर द्याहटवाHope you are doing good..
उत्तर द्याहटवाkay re diwalichi sutti sampli nahi ka ajun ? are tya nantar thandi padli mhanje punyat tari .. new year yeun gele..26 jan sample tari ajun tuzi diwalichi sutti chaluch ?? maja ahe buva !!
लहान पण देगा देवा ..
उत्तर द्याहटवाहेच वय असते निरागसपापणे बालपण उपभोगण्याचे.
मजा कर.