आई सकाळी ऑफिसला गेली की आजी, रविनाताई आणि मी कामाला लागायचो. पापड केले, रंगित फेण्या केल्या, गव्हले बनवले. किती मजा आली मला. मी माझ्यापरीने त्यांना मदत करायचो जसे, पापडाची लाटी परत कुटणे, फेण्यांचा साबुदाणा चमच्याने ढवळणे, मी गव्हले चिमटीत पकडण्याचा प्रयत्न करायचो पण ते यायचे नाहीत चिमटीत. खूपच छोटे होते ते. आजी लाडू वळायला बसली की मी लगेच चव बघायला तिथे हजर व्हायचो.

मी दुपारी झोपलो की आजी आणि रविनाताई करंज्या, अनरसे वगैरे माझी मदत नको असलेले पदार्थ करून घ्यायचे.
लग्नाच्या आदल्या दिवशी आई आणि मी मिळून रुखवतावर मांडायच्या सर्व पदार्थांचे नीट पॅकिंग केले. बॉक्समध्ये भरून पण ठेवले.
लग्नाच्या आदल्या दिवशी आई आणि मी मिळून रुखवतावर मांडायच्या सर्व पदार्थांचे नीट पॅकिंग केले. बॉक्समध्ये भरून पण ठेवले.
घरी पाहुणे आलेले सगळे माझे लाड करायचे, उचलून भूर्र न्यायचे, खाऊ द्यायचे त्यामुळे खूप मजा येत होती.
दुसर्या दिवशी म्हणजे मावशीच्या लग्नाच्या दिवशी सकाळी सव्वा पाच वाजता मी उठलो. दुदु पिउन झाल्यावर बाबांनी मला आंघोळ घातली. आईने मला लग्नासाठी खास शेरवानी ड्रेस आणला होता, त्याला छान ओढणी पण होती.
दुसर्या दिवशी म्हणजे मावशीच्या लग्नाच्या दिवशी सकाळी सव्वा पाच वाजता मी उठलो. दुदु पिउन झाल्यावर बाबांनी मला आंघोळ घातली. आईने मला लग्नासाठी खास शेरवानी ड्रेस आणला होता, त्याला छान ओढणी पण होती.
लग्नाचा हॉल एसी असल्यामुळे अजिबात गरमा झाला नाही. मी खूप हॉलभर मस्त हुंसडलो, खूप धमाल केली. रोजच्यासारखी दुपारची झोप पण काढली तिथे सोफ्यावर.
मावशीच्या लग्नात मी एक गंमत पाहिली. माझे होणारे काकांना लग्नमंडपात घेवून येताना एक वेगळेच वाद्य वाजवले त्या मिशीवाल्या काकांनी. आईने सांगितले त्याला तुतारी म्हणतात. मस्त आवाज यायचा त्याचा. मग मावशीला आणताना पण त्या काकांनी तुतारी वाजवुन वाजत गाजत मंडपात आणले. बाबांना आणि मला फार फार आवडली तुतारी.
मावशीच्या लग्नाची गडबड संपते ना संपते तो दुसर्या दिवशी अक्षयतृतीया आली. मला आत्याच्या नविन गाडीची डिलीव्हरी घ्यायला जायचे होते. तिथे सगळ्या फॉर्म्यालिटीज पूर्ण व्ह्यायला बराच वेळ गेला पण शोरूममध्ये एक मस्त छोटीशी घसरगुंडी होती, बॉल होता, छोटे टेबल आणि खुर्च्या होत्या. मी खूप मस्ती केली, खेळलो तिथे.
मग एका मोठ्या फुग्याला सायलीताईने टाचणी लावून फोडले, त्यातुन मस्त चकमक आणि थर्माकॉलचे छोटे बॉल पडले आमच्या अंगावर पडले. मोठ्या स्पिकरवर ’Congradulations' असे गाणे लावले आणि कारच्या कीज आम्हाला दिल्या.
आत्याने गाडीची पुजा केली, मग काजुकतली दिली सगळ्यांना, मी दोन खल्ल्या.
मग नविन गाडीने आम्ही आत्याला, काकांना आणि सायलीताईला डोंबिवलीला सोडून आलो.
नविन गाडीने आम्ही मस्त फिरायला पण जावून आलो पण त्याबद्दल मी पुढच्यावेळी लिहीन.
एका मुलाची मज्जा आहे बॉ. पण काय काय खादाडी केलीस ते नाही लिहिले? ते पण लिहुन टाक एकदा इथे.
उत्तर द्याहटवाDhamaal aali asel na Aryan khoop...
उत्तर द्याहटवाare mi khoop miss kele tula...baryachda yeun jaayache ithe...tu free zalas ka te baghayala... :)
Aani Sherwaanit khoop mast distoyas barr ka ( As Usal)
aani ho ekda bhetuyaat aapan... Tuzi aathwan yete mala...!!! B bayee...love u...
आर्यन तू काय काय खाऊन पाहिलंस रे?? फ़ोटो तर चविष्ट आहेत....आईने आणि मावशीने सगळं चाखलं असणार बघ दहादा....नशीब लग्नाचा मेन्यु नाही दाखवलास ते नाहीतर आम्हाला निषेध फ़लक लावावे लागले असते....आणि हो तुतारी म्हणजे मजा आहे तुझी आम्ही किती वर्षातं ऐकली ते आठवावं लागेल...
उत्तर द्याहटवा>> करंज्या, अनरसे वगैरे माझी मदत नको असलेले पदार्थ करून घ्यायचे.
उत्तर द्याहटवाहा हा.. त्यांना सांगितलंस की नाही की तुझ्या मदतीशिवाय काहीही पूर्ण होत नाही..
आणि शेरवानीत तर अजूनच गोड दिसतो आहेस रे !! :)
नवीन गाडीतून कुठे कुठे फिरून आलास ते नवीन गोष्टीत लिही पटपट..
आर्यन, शेरवानीत एकदम गोड दिसतो आहेस रे. मस्तच. आणि इतकी मदत केलीस पदार्थ बनवायला मग त्यातले काय काय खाल्लेस? तुझी मज्जाच चाललीये की... ब्लॉगर्स मेळाव्यात मोठ्ठी कॅडबरी आता हे इतके सुंदर सुंदर पदार्थ. आणि शोरूम मध्येही धमालच झाली. चला आता भटकंती येऊ दे बरं चटचट आणि फोटोही हवेतच सोबत...
उत्तर द्याहटवाआर्यन, दुडुदुडु पळत पोस्ट लिहिलीस बाबा.. आम्हालाही धावपळायला झालं.. शेरवानीत गोड दिसतो आहेस..
उत्तर द्याहटवाशीर्षक वाचून वाटलं आर्यनने लग्न व गाडी दोन्ही बुक करून टाकलं की काय?
उत्तर द्याहटवाअच्छा म्हणून स्वारी गायब होती तर गेले दोन आठवडे..भरपूर धम्माल केलेली दिसतेय..:):)
उत्तर द्याहटवाआर्यन, काय सही दिसतोयस शेरवानीत..
आर्यन मज्जा आहे बुवा तुझी शेरवानी, करंज्या, अनरसे, लाडू, फेण्या वगैरे.........
उत्तर द्याहटवाशेरवानी मस्तच आहे रे तुझी.
महेंद्रकाका,
उत्तर द्याहटवाअरे हो!
काय काय खल्ले ते सांगायचे राहून गेले.
श्रीखंड, पुरी, बटाटे वडे, मटार पनीर, तवा भाजी, दाल फ्राय, जीरा राईस, पापड, वगैरे बरेच पदार्थ होते.
मैथिलीताई,
उत्तर द्याहटवामला एक टेस्ट मेल पाठव पाहू, aaryan.kelkar@gmail.com तुला माझा पत्ता कळवतो.
माझी शेरवानी आईच्या साडीच्या रंगाला मॅचिंग होती माहित्ये का?
अपर्णाताई,
उत्तर द्याहटवाकिती पदार्थ खाउन बघितले विचारू नको करंजी, लाडू, अनरसा, नारळाची वडी आणखी बरेच.
लग्नाचा मेन्यु बघ लिहिलाय वरती.
आई मुद्दाम काहितरी वेड वाकड बनवायची आणि चांगल दिसत नाहिये असे म्हणून खाउन टाकायची.
हेरंबदादा,
उत्तर द्याहटवामाझ्या मदतीशिवाय मी बरा सोडीन त्यांना, कितीही माझ्यापासून लपवून करायला घेतले तरी मी लवकर उठून त्यांच्यात लुडबुड करायचोच. केलेले पदार्थ लपवताना त्यांची खूप गडबड व्हायची.
आईने आणलेली मला शेरवानी.
थॅंक्यु श्रीताई!
उत्तर द्याहटवाभरपुर खाउ खल्ला. धमाल होती नुसती. नविन गाडीतुन आम्ही लांब फिरुन आलो. लवकरच लिहितो आता.
आनंददा,
उत्तर द्याहटवाअरे खुप गोष्टी लिहायच्या होत्या त्यामुळे जरा धावपळ झाली.
साधक,
उत्तर द्याहटवालग्न आणि मी? मग आईला माझ्याबरोबर तिचेपण डायपर बदलावे लागतील.
सुहासदादा,
उत्तर द्याहटवाखूप बिझि होतो रे, सगळ्या कामात मी जातीने लक्ष ठेवून होतो.
सचिनदादा,
उत्तर द्याहटवाभरपुर खाउ खाल्ले. मज्जा होती नुसती आणि आई पण सुट्टीवर होती त्यामुळे आणखी धमाल.
अरे वा.. लाडूचे ताट समोर ठेऊन बसला आहेस, सगळे संपवलेस की काय?
उत्तर द्याहटवाआईला सांग, करंजीचे स्वस्तिक, चांदणी, सगळे फराळाचे पदार्थ खूप छान दिसत आहेत! (आणि चविचं तूच मला सांग)
मीनलताई,
उत्तर द्याहटवासगळे लाडू कुठले खातोय फक्त दिड लाडू खल्ला.
स्वस्तिक आईने आणि चाँदणी आजीने बनवली. एकदम टेस्टी होते सगळे पदार्थ.
जगातील सर्वात लहान ब्लोग मित्राची मजा चाली आहे तर!!!
उत्तर द्याहटवारविंद्रकाका,
उत्तर द्याहटवामाझ्या विश्वात तुमचे खूप खूप स्वागत!
माझी मस्त मज्जा चालली आहे.
अरे वा! भरपूर मज्जा मज्जा केलेली दिसतेय?! तू तर राजबिंडा आहेसच. शेरवानीमधे आणखीनच छान दिसतोयंस. आईला म्हणावं, "दृष्ट काढ माझी." नवीन गाडीची सफर लवकर लिही. आणि कित्ती काम केलंस रे बाळा तू? मदत करायला आवडते तुला? चला, एक बरं आहे, आता आईला टेन्शन नाही. हो ना?!!
उत्तर द्याहटवाकांचनताई,
उत्तर द्याहटवाथांकु थांकु.
खूप खूप मजा केली. आजी काढते माझी दृष्ट. मी आईला खूप मदत करतो, कांद्याची सालं काढणे, सुखा कचरा कचर्याच्या डब्यात टाकणे, वस्तु जागेवर ठेवणे, इ.इ.
खूप मज्जा केली बाबा अन तो तिसरा फोटो आहे न तो सगळ्यात मस्त आहे...काय देत आहेस खायला?
उत्तर द्याहटवाहा हा सागरदादा, मी अनरसा देत आहे.
उत्तर द्याहटवाआर्यन बाळा खूप मज्जा केलेली दिसते रे तू मावशीच्या लग्नात.. नाचलास की नाही.. ते फोटो पण टाक..
उत्तर द्याहटवामी दुपारी झोपलो की आजी आणि रविनाताई करंज्या, अनरसे वगैरे माझी मदत नको असलेले पदार्थ करून घ्यायचे.
उत्तर द्याहटवासही यार आर्यन ! तू माझ्याकडे येशील का, मला रोज मदत करायला ? माझा आर्यन तुझ्यासारखा शहाणा नाहिये.
श्रेयामावशी,
उत्तर द्याहटवाहो! मी नक्की येइन तुला मदत करायला.
मुक्त कलंदर,
उत्तर द्याहटवाआर्यनच्या विश्वात खुप खुप स्वागत!
नाचलो ना हॉलभर हुंदडलो मनसोक्त. भरपुर मज्जा केली.
are kuthe ahes khup divsat kahi update nahi !!
उत्तर द्याहटवा