आई सकाळी ऑफिसला गेली की आजी, रविनाताई आणि मी कामाला लागायचो. पापड केले, रंगित फेण्या केल्या, गव्हले बनवले. किती मजा आली मला. मी माझ्यापरीने त्यांना मदत करायचो जसे, पापडाची लाटी परत कुटणे, फेण्यांचा साबुदाणा चमच्याने ढवळणे, मी गव्हले चिमटीत पकडण्याचा प्रयत्न करायचो पण ते यायचे नाहीत चिमटीत. खूपच छोटे होते ते. आजी लाडू वळायला बसली की मी लगेच चव बघायला तिथे हजर व्हायचो.

मी दुपारी झोपलो की आजी आणि रविनाताई करंज्या, अनरसे वगैरे माझी मदत नको असलेले पदार्थ करून घ्यायचे.
लग्नाच्या आदल्या दिवशी आई आणि मी मिळून रुखवतावर मांडायच्या सर्व पदार्थांचे नीट पॅकिंग केले. बॉक्समध्ये भरून पण ठेवले.
लग्नाच्या आदल्या दिवशी आई आणि मी मिळून रुखवतावर मांडायच्या सर्व पदार्थांचे नीट पॅकिंग केले. बॉक्समध्ये भरून पण ठेवले.
घरी पाहुणे आलेले सगळे माझे लाड करायचे, उचलून भूर्र न्यायचे, खाऊ द्यायचे त्यामुळे खूप मजा येत होती.
दुसर्या दिवशी म्हणजे मावशीच्या लग्नाच्या दिवशी सकाळी सव्वा पाच वाजता मी उठलो. दुदु पिउन झाल्यावर बाबांनी मला आंघोळ घातली. आईने मला लग्नासाठी खास शेरवानी ड्रेस आणला होता, त्याला छान ओढणी पण होती.
दुसर्या दिवशी म्हणजे मावशीच्या लग्नाच्या दिवशी सकाळी सव्वा पाच वाजता मी उठलो. दुदु पिउन झाल्यावर बाबांनी मला आंघोळ घातली. आईने मला लग्नासाठी खास शेरवानी ड्रेस आणला होता, त्याला छान ओढणी पण होती.
लग्नाचा हॉल एसी असल्यामुळे अजिबात गरमा झाला नाही. मी खूप हॉलभर मस्त हुंसडलो, खूप धमाल केली. रोजच्यासारखी दुपारची झोप पण काढली तिथे सोफ्यावर.
मावशीच्या लग्नात मी एक गंमत पाहिली. माझे होणारे काकांना लग्नमंडपात घेवून येताना एक वेगळेच वाद्य वाजवले त्या मिशीवाल्या काकांनी. आईने सांगितले त्याला तुतारी म्हणतात. मस्त आवाज यायचा त्याचा. मग मावशीला आणताना पण त्या काकांनी तुतारी वाजवुन वाजत गाजत मंडपात आणले. बाबांना आणि मला फार फार आवडली तुतारी.
मावशीच्या लग्नाची गडबड संपते ना संपते तो दुसर्या दिवशी अक्षयतृतीया आली. मला आत्याच्या नविन गाडीची डिलीव्हरी घ्यायला जायचे होते. तिथे सगळ्या फॉर्म्यालिटीज पूर्ण व्ह्यायला बराच वेळ गेला पण शोरूममध्ये एक मस्त छोटीशी घसरगुंडी होती, बॉल होता, छोटे टेबल आणि खुर्च्या होत्या. मी खूप मस्ती केली, खेळलो तिथे.
मग एका मोठ्या फुग्याला सायलीताईने टाचणी लावून फोडले, त्यातुन मस्त चकमक आणि थर्माकॉलचे छोटे बॉल पडले आमच्या अंगावर पडले. मोठ्या स्पिकरवर ’Congradulations' असे गाणे लावले आणि कारच्या कीज आम्हाला दिल्या.
आत्याने गाडीची पुजा केली, मग काजुकतली दिली सगळ्यांना, मी दोन खल्ल्या.
मग नविन गाडीने आम्ही आत्याला, काकांना आणि सायलीताईला डोंबिवलीला सोडून आलो.
नविन गाडीने आम्ही मस्त फिरायला पण जावून आलो पण त्याबद्दल मी पुढच्यावेळी लिहीन.